काँग्रेसच्या मदतीने नाशिक जिल्हा परिषदेतही शिवसेनेचा झेंडा

0
7

नाशिक दि. 21 –: राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात महापालिकेसह जिल्हा परिषदेतही राष्ट्रवादीला पायउतार व्हावं लागलं आहे. जिल्हा परिषदेत शिवेसनेच्या शीतल उदय सांगळे अध्यक्षपदी विराजमान झाल्या आहेत, तर उपाध्यक्षपदी काँग्रेसच्या नयना गावित यांची निवड झाली आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षपदी शिवसेनेच्या शीतल सांगळे यांना 37 मतं, तर राष्ट्रवादीच्या मंदाकिनी बनकर यांना 35 मतं मिळाली. एक सदस्य तटस्थ राहिला. उपाध्यक्षपदी काँग्रेसच्या नयना गावित यांना 37, तर भाजपच्या आत्माराम कुंभार्डे यांना 35 मतं मिळाली. उपाध्यक्षपदाच्या निवडीतही एक सदस्य तटस्थ राहिला.