विचारधारा आणि मूल्यांची लढाई सुरूच राहील- मीरा कुमार

0
12

नवी दिल्ली,21 – धर्मनिरपेक्षतेसाठी माझा लढा कायम असून, सध्या देशात दडपशाही सुरू आहे, असं वक्तव्य लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार यांनी केलं आहे. विचारधारा व मूल्यांची लढाई अशीच सुरू ठेवणार आहे, मला ज्यांनी पाठिंबा आणि मतं दिली त्यांची मी आभारी आहे, असं म्हणत त्यांनी मतदारांप्रति कृतज्ञताही व्यक्त केली. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत रामनाथ कोविंद यांना सात लाख, दोन हजार, 644 आणि संयुक्त पुरोगामी आघाडीच्या उमेदवार मीरा कुमार यांना तीन लाख, 67 हजार 314 एवढी मते मिळाली आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वीही त्यांनी आरक्षणासंदर्भात भूमिका मांडली होती. पाच हजार वर्षांपासून देशात चालत आलेल्या आरक्षणाच्या व्यवस्थेला माझा विरोध आहे. कपडे धुणारे, मैला वाहणारे आणि चर्मकार या गोष्टी एकाच समाजाने करायच्या, पूजा मात्र विशिष्ट समाजानेच करायची, आधी हे आरक्षण रद्द करा मग इतर आरक्षणाकडे आपण वळू, असं मीरा कुमार म्हणाल्या होत्या.