महाराष्ट्रात सरकारची दडपशाही व पोलिसांचा दहशतवाद त्वरीत बंद करा – अॅड. डॉ. सुरेश माने

0
14

मुंबई. ( शाहरुख मुलाणी ),दि.13 – भीमा कोरेगाव प्रकरणी दलित हल्ले प्रकरणी निश्क्रिय भूमिकेत असलेली पुलिस व सरकारी यंत्रणा 3 जानेवारी बंद दरम्यान झालेल्या घटना वर अतिसक्रिय झाली आहे त्यात महाराष्ट्रात सरकारची दडपशाही व पोलिसांचा दहशतवाद त्वरीत बंद करा अशी मागणी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. डॉ. सुरेश माने यांनी केली आहे.
डॉ. माने म्हणाले की, दिनांक 29 डिसेंबर 2017 व त्याही अगोदर काही दिवस ज्यांनी पूर्व नियोजित कटकारस्तान करुन 29 डिसेंबर 2017 रोजी मुक्काम पोस्ट वढु येथील शूरवीर संभाजी राजे यांच्या समाधी जवळ असलेली गोविंद गायकवाड यांची समाधी ध्वस्त केली व दिनांक 1 जानेवारी 2018 रोजी कोरेगांव भीमा येथे येणाऱ्या  जनतेवर सशस्त्र हल्ले केले त्या कटाचे सूत्रधार, त्या कटात सहभागी झालेले आजूबाजूच्या गावातील जातीयवादी माथेफिरु हे मोकाट फिरत असताना व त्यांचेवर सरकार, पुलिस यंत्रणेचा आशिर्वाद असताना 3 जानेवारी 2018 रोजी महाराष्ट्र बंद दरम्यान त्याच जातियवादी शक्ती आणि प्रवृत्तीनी खुलेपणाने पुन्हा एकदा निरपराध आंबेडकरी जनतेवर हल्ले केले, त्यांच्या मालमत्तेचे नुकसान केले व त्यांच्या अस्मिता-प्रतिमांची खुलेआम मोडतोड करुन अवमानना केल्यामुळे बंद रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत शांततामय मार्गाने बंद मध्ये सामिल झालेली आंबेडकरी जनता संघर्षात उतरणे ही देखील एक नैसर्गिक प्रक्रिया असताना व बंद दरम्यान काही जातीय शक्तिंद्वारे व असामाजिक तत्वांद्वारे सरकारी मालमत्तावर हल्ले करणे, पोलिसांवर प्राणघातक हल्ले करणे असे खोटे आरोप बनवून 1 जानेवारी 2018 रोजी दलित हल्ले प्रकरणी निश्क्रिय भूमिकेत असलेली पुलिस व सरकारी यंत्रणा 3 जानेवारी बंद दरम्यान झालेल्या घटना वर अतिसक्रिय झाली असून संपूर्ण राज्यभर, रात्री-अपरात्री, स्त्री, लहान मुले-मुली, विद्यार्थी व 80-85 वर्षाचे वयोवृद्ध यांच्यावर अमानुश अटकसत्राद्वारे व 307, 333, 395 व इतर भारतीय दंड संहिता चे कलमांचा बेसुमार वापर करुन सरकारी दहशतवाद पसरवित असून आम्ही त्याचा जाहिर निषेध करीत आहोत व तो कोणत्याही परिस्थितीत थांबलाच पाहिजे यासाठी सरकार, पुलिस यंत्रणा यांना विनंती व सूचना करीत आहोत की सरकारने हे त्वरीत न थांबविल्यास लवकरच यामुळे सरकार विरोधी उद्रेक कोणत्याही मार्गाने प्रकट होऊ सकतो, अशा इशारा राज्य सरकार व पुलिस यंत्रणेला देत आहोत. शिवाय असे घटनाबाह्य व कायद्यांचा गैरवापर करुन व पुलिस यंत्रणेचा गैरवापर करणाऱ्या सर्वांविरुद्ध न्यायालयीन व इतर प्रक्रियेद्वारा कारवाई करण्याचा जाहीर इशारा देत आहोत. राज्यातील दंगल प्रभावित आंबेडकरी-बहुजन जनतेने संघर्षाची कास न सोडता अशा कठीन प्रसंगास धाडसीपणाने सामोरे जावे व आपल्यावरील अन्यायाचा, अत्याचाराचा, अपमानाचा बदला 2019 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आपली स्वतंत्र शक्ती दाखवून द्यावी असे आम्ही जाहीर आवाहन करीत आहोत. त्याचबरोबर राज्यातील सर्व बहुजनवादी, आंबेडकरवादी संघटना, नेते, पक्ष व गैर-कांग्रेस गैर-भाजपा समर्थक पक्ष नेते, संघटना यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी, वंचित वर्गाच्या सुरक्षिततेसाठी, व किमान समान व सर्वमान्य कार्यक्रमांवर आधारीत रणनीति बनविणे, संघर्श करणे, ही काळाची गरज लक्षात घेवून सर्व संबंधीतांनी तत्परतेने यावर निर्णय घ्यावे असेही डॉ. माने यांनी जाहिर अपील केली आहे.