यवतमाळात पार पडला समलैंगिक विवाह

0
9

यवतमाळ,दि.12(विशेष प्रतिनिधी) – शहरातील एका प्रतिष्ठित व्यावसायिकाच्या मुलाने काल (बुधवारी) विदेशातील आपल्या समलैंगिक मित्रासोबतच वैदिक पद्धतीने विवाह केला. हा मुलगा अमेरिकेत नोकरीनिमित्त वास्तव्याला आहे. यवतमाळात पहिल्यांदाच समलैंगिक विवाह झाल्याने, हा विवाह शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. या विवाहाला मुलाच्या आईचा प्रचंड विरोध असल्याने मोजक्‍याच नातेवाइकांच्या उपस्थितीत हा विवाह पार पडला.नवविवाहित जोडप्यातील दुसरा मुलगा इंडोनेशियाचा असून, तोदेखील अमेरिकेतच वास्तव्याला आहे. दोघेही एकाच कंपनीत नोकरीला असून, दोघांनाही मोठ्या पगाराच्या नोकऱ्या आहेत. काही दिवसांपासून ते ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत होते. त्यानंतर त्यांनी आपला निर्णय कुटुंबीयांना सांगितला.अमेरिका, चीनमधून ५०-६० मित्र आले होते. त्यात १० समलिंगी जोडप्यांचाही समावेश होता.