दिल्लीतील मतदान संपले, यंदा रेकॉर्डब्रेक मतदान

0
9

नवी दिल्ली, दि. ७ – संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी शनिवारी शांततापूर्ण वातावरण मतदान पार पडले. गेल्या वेळच्या विधानसभा निवडणुकीपेक्षा यंदा दिल्लीत रेकॉर्डब्रेक मतदान झाल्याची शक्यता वर्तवली जात असून थोड्याच वेळाच मतदानाची नेमकी टक्केवारी समजू शकेल.
किरण बेदींना पुढे करुन दिल्लीचे तख्त काबीज करण्याच्या प्रयत्नात असलेला भाजपा आणि पुन्हा मुख्यमंत्रीपदावर विराजमान होण्यासाठी इच्छूक असलेले अरविंद केजरीवाल यांच्यामुळे दिल्ली विधानसभा निवडणूक लक्षवेधी ठरली आहे. ७० जागा असलेल्या दिल्ली विधानसभेसाठी शनिवारी मतदान झाले. सकाळी ८ वाजता मतदानास सुरूवात झाली. अपेक्षेप्रमाणे दिल्लीकरांनी मतदानाचा चांगला प्रतिसाद देत उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक यंत्रात बंद केले. संध्याकाळी पाचवाजेपर्यंत सुमारे ६३ टक्के मतदान झाले होते. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत दिल्लीतील ६५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्का बजावला होता. यंदा यापेक्षा जास्त मतदान झाल्याचा अंदाज निवडणूक आयोगाच्या अधिका-यांनी वर्तवला आहे.