भाजपा सरकारकडून लोकशाहीला धोका-सहषराम कोरोटे

0
10
 काँग्रेसची ‘संविधान बचाव-देश बचाव’ रॅली,शेकडो बैलबंड्यांचा समावेश
गोंदिया,दि.02 : जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाNया भारताने भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीने खया अर्थाने लोकशाहीची प्रस्थापना झाली. संविधानामुळेच देशाचे ऐक्य व एकात्मता कायम टिकून आहे. मात्र देशातील व राज्यातील सरकार वारंवार संविधान बदलण्याचे भाष्य करीत आहे. त्यामुळे लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. भाजपा सरकार फक्त देशातील जनतेला आश्वासने देवून त्यांची फसवणूक करीत आहे. असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेसचे महासचिव सहषराम कोरोटे यांनी केले.जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आज २ पेâब्रुवारी रोजी ‘संविधान बचाव-देश बचाव’ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कटरे, जि.प.अध्यक्षा सीमा मडावी, माजी जि.प.अध्यक्षा उषाताई मेंढे, माजी जि.प.सभापती पी.जी.कटरे, राजेश नंदागवळी, डॉ. योगेंद्र भगत, पं.स.उपसभापती माधुरीताई हरिणखेडे, प्रदेश प्रतिनिधी पृथ्वीपालसिंग गुलाटी,सभापती रमेश अंबुले,लता दोनोडे व अन्य उपस्थित होते. पूढे बोलताना कोरोटे यांनी वाढती महागाई, बेरोजगारी, धानाला हमीभाव यासह महत्वपूर्ण समस्या भाजप शासनाने रेंगाळत ठेवलेल्या आहेत. परिणामी शेतकNयांसह सामान्य जनतेची फरफट होत असल्याचे म्हणाले. सुरूवातीला शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात डॉ.आंबेडकरांना पुष्पमाला घालून भाजप सरकारने वारंवार पेट्रोल व डिझेलच्या किमतीमध्ये दरवाढ करून जनतेची फसवणूक सुरू असल्याचा  आरोप करून त्या निषेधार्थ काँग्रेसच्यावतीने भव्य बैलबंडी मोर्चा शुक्रवारी दुपारी ३ वाजता उपविभागीय कार्यालयावर काढण्यात आला. त्यानंतर मोर्चेकरी बैलबंडीनेच एसडीओ कार्यालयात पोहोचले. त्यामुळे काळ वाहतुक विस्कळीत झाली होती. त्यानंतर मोच्र्याचे रूपांतर भव्य सभेत झाले. सभेत काँग्रेस नेत्यांनी भाजपावर जोरदार टीका हल्लाबोल केला. सभेचे संचालन अपूर्व अग्रवाल यांनी केले.  तर आभार संकेश तिवारी यांनी मानले. दरम्यान निवासी उपविभागीय अधिकाNयांना निवेदन देण्यात आले. यावेळी राकेश ठावूâर, नगरसेवक, सुनिल तिवारी,भागवत मेश्राम,संदिप ठावूâर, सुशिल रहांग़डाले, संकेश तिवारी, शेषराव गिNहेपुंजे, विकास बंसल,देवेंद्र अग्रवाल, गुड्डू ठावूâर, देवा रूसे,संदिप रहांगडाले, नगर कॉग्रेसचे अध्यक्ष बलजितसिंग बग्गा,सौरभ शर्मा, व्यंकट पाथरू,कुरमराज चौहान,नगरसेवक देवा रूसे, भागवत मेश्राम, अ‍ॅड. योगेश अग्रवाल,नफिसभाई सिद्दीकी,खलीलभाई पठाण व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.