एक मार्चला जम्मू-काश्मीरमध्ये सत्ता स्थापन होणार?

0
15

नवी दिल्ली – राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेल्या जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच पीडीपी-भाजपा आघाडी सरकारची सत्ता स्थापन होण्याची शक्यता आहे. येत्या एक मार्चला राज्यात सत्ता स्थापन होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
लष्कराला विशेष अधिकार देणा-या एएफएसपीए कायदा तसेच कलम ३७०या मुद्द्यांचा समावेश असलेल्या किमान समान कार्यक्रमाला दोन्ही पक्षांनी सहमती दर्शविल्याने दोन्ही पक्षांमध्ये सत्तास्थापनेच्या जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत.
मंगळवारी पीडीपीच्या प्रमुख मुफ्ती भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
एक मार्चला राज्यात सत्ता स्थापन होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. तसेच मुफ्ती या सहा वर्षे मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळतील तर भाजपाचे निर्मल सिंग उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळतील अशी माहिती सूत्रांनी दिली.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पीडीपीने राज्यात सर्वाधिक २८ जागांवर विजय मिळवला तर भाजपाला २५ जागांवर यश मिळाले होते.