पत्रकारांना निवृत्तीवेतन योजना सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक – मुख्यमंत्री

0
12

मुंबई : अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना निवृत्तीवेतन योजना सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाच्या नवनियुक्त कार्यकारणीच्या सदस्यांनी सोमवारी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माहिती महासंचालक चंद्रशेखर ओक, संचालक देवेंद्र भुजबळ, उपसंचालक गणेश मुळे, मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी अर्चना शंभरकर, मुख्यमंत्र्यांचे माध्यम सल्लागार रवीकिरण देशमुख, केतन पाठक आदी उपस्थित होते.

यावेळी अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना स्व.शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीचा फायदा देणे, विमा योजना सुरु करणे आदी विविध मागण्यांचे निवेदन वार्ताहर संघाचे अध्यक्ष चंदन शिरवाळे तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठी मंत्रालयात जागा उपलब्ध करुन देण्याबाबतचे निवेदन टी.व्ही.जर्नालिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विलास आठवले यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष चंदन शिरवाळे, उपाध्यक्ष प्रमोद डोईफोडे, कार्यवाह चंद्रकांत शिंदे, कार्यकारिणी सदस्य खंडूराज गायकवाड, सुरेंद्र मिश्र, अनिल तिवारी, राजू झनके यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. प्रारंभी महासंचालक श्री.ओक यांनी मुख्यमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी हेमराज बागूल यांनी वार्ताहर संघाच्या सर्व कार्यकारिणी सदस्यांची ओळख मुख्यमंत्र्यांना करुन दिली.