जिल्ह्यातील काँग्रेस नेतृत्वाला झुगारत माजी.जि.प.उपाध्य़क्ष राष्ट्रवादीत

0
12

गोंदिया,दि.25-गोंदिया जिल्हा काँग्रेसच्या महिला आघाडीच्या नेत्या तसेच जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष राहिलेल्या सडक अजुर्नी तालुक्यातील काँग्रेस नेत्या छायाताई चव्हाण व सडक अर्जुर्नी तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष हिरालाल चव्हाण यांनी गोंदिया जिल्ह्या काँग्रेसला आपल्या घरातून चालविणार्या नेतृत्वाला झुगारत खासदार प्रफुल पटेल यांच्या नेतृ्त्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.श्रीमती चव्हाण यांनी डव्वा जिल्हा परिषद गटातून उमेदवारी मागितली होती,परंतु काँग्रेसचे एकमेव आमदार असलेले गोंदियातील नेत्यांने त्यांना उमेदवारी देण्याएैवजी भाजप ,सेना असा प्रवेश करुन आलेल्या राजू पटले यांना उमेदवारी स्थानिक कार्यकत्यार्ना डावलून दिल्याने काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज झाले होते.त्यातच प्रफुल पटेलाची विकासाप्रतीची भावना लक्षात घेत 24 तारखेला प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.यावेळी आमदार राजेंद्र जैन,अविनाश काशीवार,मिलन राऊत ,गंगाधर परशुरामकर,मनोहर चंदॅिकापुरे आदी नेते उपस्थित होते.चव्हाण यांच्या प्रवेशाना काँग्रेसला डव्वा जिल्हा परिषदच नव्हे तर पांढरी जिल्हा परिषद मतदारसंघातही फटका बसला आहे.या दोन्ही जागेवर काँग्रेसला फटका बसणार हे नक्की झाले आहे.