योगेश चव्हाण व मिलिंद कुमार गेडाम यांना सुवर्ण लक्ष पुरस्कार

0
21

गडचिरोली- नवी दिल्ली येथील मेजर ध्यानचंद केंद्रीय क्रीडा परिषदने राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून परिषदेतर्फे प्रतिवर्ष देण्यात येणाऱ्या सुवर्ण लक्ष्य राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार यंदा गडचिरोलीच्या कराट पटू योगेश चव्हाण राष्ट्रीय कराटे प्रशिक्षक व सेन्साई मिलिंद कुमार गेडाम राष्ट्रीय कराटे खेळाडू यांना पुरस्कार देण्यात आले. पुरस्काराचे वितरण सांगली जिल्ह्यातील मिरज येथे कार्यक्रम पार पडला. बालगंधर्व नाट्यगृह महापौर दिग्विजय सूर्यवंशी राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष संजय बजाज, युवा अध्यक्ष राहुल पवार, नगरसेवक शेखर माने यांच्या हस्ते करण्यात आले.
योगेश चव्हाण मागील वीस वर्षापासून गडचिरोलीतील कराटेपटूना प्रशिक्षण देण्याचे कार्य करीत आहे.  त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडलेले आहेत व घडवीत आहेत त्यात मिलिंद गेडाम यालासुद्धा राष्ट्रीय कराटेपटू म्हणून सतत उत्कृष्ट उत्कृष्ट कामगिरीसाठी ध्यानचंद परिषदने हा पुरस्कार सुवर्णलक्ष्य पुरस्कार देण्यात आला. सुवर्ण लक्ष्य पुरस्कार हा विविध खेळ प्रकारासाठी दिला जातो. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी देशातून विविध खेड प्रकारातील पुरस्कारार्थी सहभागी झाले होते. आपल्या यशाचे श्रेय गडचिरोली कराटे संघटनेचे अध्यक्ष प्रशांत वाघरे उपाध्यक्ष  रूपराज वाकोडे गोंडवाना सैनिकी विद्यालयतील मुख्याध्यापक संजीव गोसावी उपमुख्याध्यापक ओम प्रकाश संग्रामे अजय वानखेडे व समस्त गडचिरोली वासियांना दिले आहे.