अरबाज भवानीवाले यांची राज्यस्तरीय निवड

0
22

बुलढाणा,दि.14ः-येथील क्रीडा संकुलात ओपन वयोगटातील झालेल्या मैदानी सामन्यात अरबाज भवानीवाले(रा.गवळीपुरा मेहकर) यांची 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड झाली आहे.
बुलडाणा जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशन, बुलडाणा जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, बुलडाणा ,बुलडाणा अॅथलेटिक्स क्लब, बुलडाणा यांच्या सहाय्याने जिल्हास्तरीय वरिष्ठ गट अजिंक्यपद स्पर्धा व राज्यस्तरीय वरिष्ठ गट निवड चाचणी – 13 एप्रिल रोजी संपन्न झाली . 200 मीटर धावण्याच्या शर्यती मध्ये जिल्हाभरातून 28 खेळाडूंनी सहभाग नोंदवला. अटीतटीच्या झालेल्या या स्पर्धेमध्ये लोणार तालुक्यामधील तळणी येथील स्वप्निल सरकटे मेहकर शहरातील अरबाज भवानी वाले त्याच प्रमाणे दुबे या युवकाची निवड करण्यात आली आहे. या सर्वांची दिनांक 21 ते 23 एप्रिल 2022 ला भोसरी ,पिंपरी चिंचवड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय मैदानी वरिष्ठ गट स्पर्धेसाठी बुलढाणा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे .. विशेष म्हणजे अरबाज भवानीवाले यापूर्वीसुद्धा गोवा येथे झालेल्या खुल्या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक मिळवले होते. राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये अथक परिश्रम करून बुलढाणा जिल्ह्याचा प्रथम पदी निवडण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. अरबाज भवानीवाले स्वप्निल सरकटे यांची मित्र परिवाराकडून प्रशंसा केली जात आहे.