उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीराची उत्साहात सुरुवात

0
25

ग्रीष्मकालीन क्रीडा स्पर्धेचे उदघाटन

 वाशिमदि. 19  उन्हाळी प्रशिक्षण शिबीराच्या माध्यमातून क्रीडा गुण, कौशल्य तसेच शारिरीक व मानसिकरित्या योग्य खेळाडू व त्याचे सुप्त गुण विकसीत व्हावे. या दृष्टीकोणातून खेळाडुंनी निरंतर मैदानावर येऊन सराव करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन शिबीराचे उदघाटक जिल्हा क्रीडा पुरस्कार विजेते जनाब रफीक खान यांनी केले.

            क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वाशिम, जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र तसेच विविध क्रीडा संघटनाच्या वतीने जिल्हा क्रीडा संकुल वाशिम येथे उन्हाळी ग्रीमष्कालीन क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे उद्‌घाटन 18 एप्रिल रोजी करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य सायकलिंग असोशिएशनचे उपाध्यक्ष धनंजय वानखेडे होते. जेष्ठ क्रीडा शिक्षक दत्तराव खरडे, राज्य क्रीडा मार्गदर्शक किशोर बोंडे, बालाजी शिरसीकर, रायफल शुटींग व कुस्ती संघटनेचे प्रल्हाद आळणे, कराटे संघटनेचे सुनिल देशमुख, अॅथलॅटीक्स संघटनेचे चेतन शेंडे, मराविविकं श्री. चव्हाण, जिल्हा पुरस्कार विजेते विजय मोटघरे, अशोक राऊत, शिवाजी देशमुख, वेटलिफ्टींग संघटनेचे नारायण ठेंगडे, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे विजय राजपुत, बास्केटबॉल प्रशिक्षक व लॉन टेनिस असोशिएशनचे राजदीप मनवर, अॅथलॅटीक्स प्रशिक्षक प्रदिप बोडखे, क्रिकेटर विक्की खोबरागडे, आर्चरी संघटना व ऐम आर्चरी अॅकडमीचे अनिल थडकर, स्क्वॉश संघटनेचे पवन राऊत, कबड्डी प्रशिक्षक निखिल मालोकार, किक बॉक्सींग संघटनेचे रंजित कथडे व बॅडमिंटन प्रशिक्षक अर्षद सय्यद आदींची प्रमुख उपस्थिती होती.

              यावेळी धनंजय वानखेडे यांनी खेळाडूने जिद्दीने आणि प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनात योग्य सराव केला तर ऑलम्पीक स्पर्धा ही आपल्यासाठी दूर नाही म्हणुन अभ्यासासोबतच खेळाचा चांगला सराव सुध्दा महत्वाचा आहे. असे मत व्यक्त केले.

              कार्यक्रमाचे संचालन स्काऊट गाईडचे जिल्हा संघटक राजेश गावंडे यांनी केले. आभार सुरज भड़ यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र कबड्डीचे खेळाडू तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे क्रीडा अधिकारी संजय पांडे, मिलींद काटोलकर, भारत वैद्य, कलिम मिर्झा, शुभम कंकाळ, महेश बोथीकर, विनायक जवळकर, सतीश पवार, उज्वला डुडुल व शितल शेवलकर यांनी सहकार्य केले. हे प्रशिक्षण शिबीर 18 एप्रिल ते 2 मे 2022 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. जे खेळाडू शिबीरास उपस्थित राहतील अशा सर्व खेळाडुंना सहभाग प्रमाणपत्र वितरीत करण्यात येईल. या शिबीराचा जास्तीत जास्त खेळाडूंनी लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता यांनी केले आहे.