कामगारांच्या हिताला बाधा येऊ दिली जाणार नाही – कामगार व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

0
15

मुंबई दि. 19 : केंद्र सरकारच्या कामगार कायद्यांची अंमलबजावणी करताना कामगारांच्या हिताला बाधा येऊ दिली जाणार नाही, असे आश्वासन कामगार व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, प्रभादेवी, मुंबई येथे आयोजित 34 व्या गुणवंत कामगार पुरस्कार वितरण सोहळ्यात मंत्री मुश्रीफ बोलत होते.

यावेळी ” हाफकीन जीव औषध निर्माण महामंडळा”स रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे कामगार मित्र पुरस्कार 2019 देऊन गौरविण्यात आले रुपये ७५ हजार, स्मृतीचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे, तर रु.५० हजार, स्मृतीचिन्ह आणि मानपत्र असे स्वरूप असलेला 2019चा कामगार भूषण पुरस्कार राजेंद्र हिरामण वाघ, कमिन्स इंडिया लिमिटेड, कोथरूड पुणे यांना देण्यात आला. तसेच रु.२५ हजार, स्मृतीचिन्ह आणि मानपत्र असे स्वरूप असलेल्या गुणवंत कामगार कल्याण पुरस्काराने ५१ कामगारांना गौरविण्यात आले

कार्यक्रमास कामगार राज्यमंत्री श्री. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, कामगार विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती विनिता वेद-सिंगल, विकास आयुक्त (असंघटित कामगार) डॉ.अश्विनी जोशी, कामगार आयुक्त श्री.सुरेश जाधव, कामगार विभागाचे उपसचिव डॉ. श्रीकांत पुलकुंडवार, कामगार विभागाचे उपसचिव श्री.शशांक साठे, कल्याण आयुक्त रविराज इळवे आदी मान्यवर उपस्थित होते.

मंत्री श्री.मुश्रीफ म्हणाले, असंघटीत क्षेत्रातील वाहन चालक, शेतमजूर, ऊस तोड कामगार आदीं असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी महामंडळे स्थापन करण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील आहे. त्या माध्यमातून त्यांच्या जीवनात आनंद निर्माण हा
होणार आहे. संघटीत कामगारांना सुरक्षा असते, कायदेशीर संरक्षण असते मात्र असंघटीत कामगारांच्या बाबतीत अशी परिस्थिती नसते. असंघटीत कामगारांच्या मनात असुरक्षिततेची भावना दूर करण्यासाठी राज्य शासन उद्योगधंद्यांच्या आस्थापना ह्या कामगारांच्या हिताला बाधा पोहोचनार नाही, अशी धोरणे अंगीकारण्यास प्रवृत्त करेल. कुठल्याही देशाचा जीडीपी मालकामुळे न वाढता कामगारांमुळे वाढतो. त्यामुळे सर्व कारखानदारांनी कामगारांच्या श्रमाला प्रतिष्ठा द्यावी, असे आवाहनही मंत्री श्री.मुश्रीफ यांनी यावेळी केले.

राज्यमंत्री श्री. कडू म्हणाले, श्रमावर आधारित योजना निर्माण झाल्या पाहिजेत. कामगारांचे हात बंद पडले की देश बंद पडतो. केंद्राच्या कामगार कायद्याचा कामगारांना फटका बसू नये यासाठी राज्य शासन प्रयत्नशील राहील. कामगार मागे राहू नये यासाठी राज्य शासन आपले धोरण अवलंबेल, असे राज्यमंत्री श्री.कडू म्हणाले.
दरम्यान मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते नूतनीकरण झालेल्या अभ्यासिकेचे उद्घाटन झाले.

समारंभापूर्वी मंत्री श्री.मुश्रीफ व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हुतात्मा बाबू गेनू यांच्या पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर मंत्री श्री.मुश्रीफ व राज्य श्री. कडू यांच्या हस्ते रावबहादुर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट कामगार कल्याण मंडळाच्या श्रमकल्याण युग या मासिकाच्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी प्रास्ताविक केले तर सहायक कल्याण आयुक्त माधवी सुर्वे यांनी आभार मानले.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गुणवंत कामगार पुरस्कार सन २०१९

रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे कामगार मित्र पुरस्कार सन २०१९- हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ

कामगार भूषण पुरस्कार सन २०१९-श्री. राजेंद्र हिरामण वाघ, कमिन्स इंडिया लि., कोथरूड, पुणे

गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार सन २०१९

१. श्रीमती नजमाबी गुलाब शेख
कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक, इचलकरंजी
२. श्री. किरण चंद्रकांत देशमुख
अल्फा लवाल (इंडिया) प्रा.लि., दापोडी, पुणे
३. डॉ.स्मिता समीर माहुरकर
एल.आय.सी., नागपूर
४. श्री. लीलाधर रामेश्वरजी दवंडे
इंडोरामा सिंथेटीक्स (इं), लि., बुटीबोरी, नागपूर
५. श्री. हनुमंत रामचंद्र जाधव
लोकमान्य हॉस्पिटल, निगडी, पुणे
६. श्री. संतोष मारोतराव ताजने
चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्र, ऊर्जा नगर, चंद्रपूर
७. श्री. किरण राजाराम जाधव
हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळ, मुंबई
८. श्रीमती महानंदा भगवानराव केंद्रे
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, परभणी
९. श्री सुरेश श्रीनाथराव बोर्डे
बजाज ऑटो लि. वाळूज, औरंगाबाद
१०. श्री. कुलदीप जनार्दन सावंत
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, उस्मानाबाद
११. श्री. बाळासाहेब लिंबराज साळुंके
टाटा मोटर्स कंपनी लि., पिंपरी, पुणे.
१२. श्री शिवाजी सुबराव पाटील
टाटा मोटर्स लि. पिंपरी, पुणे.
१३. श्री. श्रावण बाबनराव कोळनूरकर
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं., औरंगाबाद
१४. श्री. पंजाबराव गोविंदराव मोरे
प्रबोधन प्रकाशन प्रा.लि., दैनिक सामना औरंगबाद
१५. श्री. योगेश रावण कापडणीस
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कं., औष्णिक विद्युत केंद्र, एकलहरे, नाशिक
१६. श्री. राजेश रमाकांत वर्तक
टाटा स्टील लिमिटेड, तारापूर, पालघर.
१७. श्री. नितीन रामचंद्र पाटील
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, विभागीय कार्यशाळा चंदनवाडी, मिरज
१८. श्री. राजेशकुमार ओंकारमल राजोरे
विदर्भ पब्लिकेशन प्रा. लि. , दैनिक देशोन्नती, अकोला
१९. श्री. विठ्ठल सखाराम तांबे
गोदरेज ॲन्ड बॉईज मॅन्यु.कं.लि., शिरवळ, सातारा
२०. श्री गजानन कृष्णाजी पिसे
सहकार महर्षी शंकरराव मोहिते -पाटील सहकारी साखर कारखाना, लि., अकलूज, सोलापूर.
२१. श्री. पंकज गोवर्धनराव ठाकरे
ग्राईंडवेल नॉर्टन लि., बुटीबोरी, नागपूर
२२. श्री. संजीव राम माने
कमिन्स इंडिया लि., कोथरूड, पुणे
२३. श्री. अरुण वैजनाथ भालेकर
कोहलर पावर इंडीया प्रा.लि. चिकलठाणा, औरंगाबाद
२४. श्री. बबन भिकाजी भारस्कर
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्या., बल्लारशहा, चंद्रपूर
२५. श्री. दत्तात्रय पांडुरंग गायकवाड
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मध्यवर्ती कार्यशाळा, दापोडी, पुणे
२६. श्री.संजीव आनंदा सुरवाडे
मध्य रेल्वे, विद्युत इंजिन कारखाना, भुसावळ
२७. श्री. विलास हसुराम म्हात्रे
नवी मुंबई महानगरपालिका, परिवहन उपक्रम, बेलापूर
२८. श्री. तानाजी एकनाथ निकम
कॅनरा बँक, घाटकोपर, मुंबई.
२९. श्री. अविनाश एकनाथ दौंड
शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, चर्नी रोड, मुंबई
३०. श्री विनोद नारायण विचारे
भारतीय स्टेट बँक, लालबाग, मुंबई
३१. श्री. संपत विष्णु तावरे
महानंद दुग्धशाळा, गोरेगांव
३२. श्री. सुर्यकांत बाबुराव पदकोंडे
बजाज ॲटो लिमिटेड, बजाज नगर, वाळूज, औरंगाबाद.
३३. श्री. सखाराम रामचंद्र इंदोरे
गोदरेज ॲन्ड बॉईज कं.लि., विक्रोळी, मुंबई
३४. श्री. नितीन रामदास बेनकर
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना लि. शंकरनगर-अकलूज, सोलापूर
३५. श्री. काळुराम पांडुरंग लांडगे
पुणे महानगर परिवहन महामंडळ, लि.स्वारगेट, पुणे
३६. श्री. दिलीप विठ्ठलराव ठाकरे
मध्यवर्ती कारागृह मुद्रणालय, निरी, नागपूर
३७. श्री. इम्रानअली रमजान शिकलगार
किर्लोस्कर ब्रदर्स लि. किर्लोस्करवाडी, सांगली
३८. श्री. वैभव हरीश्चंद्र भोईर
ठाणे महानगरपालिका परिवहन सेवा, ठाणे
३९. सौ. संगीता धनंजय भोईटे
श्रीराम शेतकरी कामगार सहकारी ग्राहक संस्था मर्या. फलटण, सातारा.
४०. श्री राम बारका सारंग
माझगांव डॉक शिप बिल्डर्स लि., माझगांव, मुंबई
४१. श्री. अजय यशवंत दळवी
सिम्बोलिक फॅब्रिक प्रा.लि., भिवंडी, ठाणे
४२. श्री. जयवंत यशवंत कुपटे
भारत बिजली लि., ऐरोली, नवी मुंबई
४३ श्री. चंद्रकांत महादेव मोरे
बँक ऑफ महाराष्ट्र, परेल शाखा, मुंबई
४४. श्री. दिनकर बापु आडसुळ
मेनन पिस्टन रिंग्ज प्रा.लि., संभापुर, हातकंणगले, कोल्हापूर.
४५. श्री. दिलीप नामदेव पासलकर
कमिन्स इंडीया लि.कोथरुड, पुणे
४६. श्री. विजय संभाजी आरेकर
एस.बी.रिसेलर्स, कागल, एम.आय.डी.सी. कोल्हापुर.
४७. श्री. गणेश यशवंत काळे
करन्सी नोट प्रेस, जेलरोड, नाशिक.
४८. श्री संजय शांताराम तावडे
मुंबई पोर्ट ट्रस्ट, मुंबई
४९. श्री. विजय तुकाराम रणखांब
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, जिंतुर रोड, परभणी
५०. श्री. अशोक सु-याबा आलदर
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या., विभाग पंढरपूर
५१. श्री. बालाजी किसन नलवडे
किर्लोस्कर ब्रदर्स लि. किर्लोस्करवाडी, पलूस, सांगली.