राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पध्रेत गोंदियातील खेळाडू चमकले

0
12

गोंदिया-अहमदनगर येथे १५ ते १७ मे ला झालेली राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. या स्पध्रेत जिल्ह्यातील किक बॉसिंग डोजोच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करत तीन पदकांची कमाई केलेली आहे. मेडल प्राप्त करणार्‍या खेळाडूंमध्ये नपुर झिनजारीया (सुवर्ण पदक), काज भोयर (सुवर्ण पदक), वैष्णवी शिरधरे (रजत व कास्य पदक) या सर्व खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धे करिता निवड निश्‍चित झाली आहे.
वरिल सर्व विद्यार्थ्यांनी गोंदिया शहराचे नावे लौकीक केले आहे. या सर्व खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय आपले आई-वडिल, प्रशिक्षक मुकेश शेंडे, सह प्रशिक्षक रमेंद्र बावनकर यांना दिले आहे.
वरिल पदक विजयी खेळाडूंचा राष्ट्रीय स्पध्रेकरिता नाव निश्‍चित झालेला असुन राष्ट्रीय स्पर्धा ही २१ ते २५ जून ला कलकत्ता येथे होणार आहे. या सर्व यशस्वी खेळाडूंचे किक बॉक्सिंग असो.चे अध्यक्ष हेमंत चावके, तेजासिंग आलोत, अनील शहारे, विशाल ठाकुर, संगम बावनकर, दिपक सिक्का, निलेश फुलबांधे, मुजिफ बेग, चेतन मानकर, प्रेम जायस्वाल आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
तसेच कराटे, किक बॉक्सिंग क्लबचे प्रशिक्षक मुकेश शेंडे यांनी राज्यस्तर किक बॉक्सिंग पंच परिक्षा पास करून गोंदिया जिल्ह्यात प्रमाणीत पंच म्हणून आपला नाव राज्यात नोंदवित गोंदिया जिल्ह्याचा नाव लौकिक केला आहे.