तिरोड्यात ५.३८ लाखांची घरफोडी

0
39

तिरोडा-तिरोडा तालुक्यासह गोंदिया जिल्ह्यात घरफोडी, दुकानफोडी अशा चोरीच्या घटनांमध्ये काही घट येताना दिसून येत नाही. उलट ग्रामीण भागात चोरटे संधीचा लाभ घेत लाखोच्या मालावर हातसाफ करीत आहेत. यामुळे गोंदिया जिल्ह्यात दुचाकी चोरट्यांच्या टोळीसह घरफोडी करणारी टोळी तेवढीच सक्रिय असल्याची चर्चा आहे. स्थानिक सहकार नगरात २१ मेच्या रात्री घराचे दार तोडून अज्ञात चोरट्यांनी सोने-चांदीचे दागिणे व ३0 हजार रुपए रोख असा एकूण ५ लाख ३७ हजार ८00 रूपयाचा माल लंपास केला. या घटनेमुळे तिरोड्यात चोरांची दहशत वाढत चालली आहे.
स्थानिक सहकार नगर येथील किशोर तिलकचंद रहांगडाले हे बाहेरगावी गेले होते. या संधीचा लाभ घेत अज्ञात चोरट्यांनी घराचे दार तोडून घरातील आलमारी फोडली. दरम्यान सोन्याचे मंगळसुत्र दोन नगर, सोन साखळी पाच, सोन्याचे टॉप्स, सोन्याच्या पाच अंगठी, चार नथ, १0 मणी, ५ बाली, चांदीचे पैजन, कळदान, बिछीया व इतर दागिणे त्याचप्रमाणे ३0 हजार रुपए रोख असा एकूण ५ लाख ३७ हजार ८00 रूपयाचा माल लंपास केला आहे. या घटनेची नोंद तिरोडा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. उल्लेखनिय असे की, गोंदिया जिल्ह्यात चोरीच्या घटनांचा आलेख दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तिरोडा तालुक्यात भुरट्या चोरांचा शुळशुळाट असल्याने नागरिकांमध्ये चोरांची दहशत निर्माण झाली आहे. यामुळे पोलिसांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत.