मोहाडी- तालुक्यातील निलज खुर्द या छोट्याशा गावातील सुशीकला आपल्या मेहनत व जिद्दीच्या बळावर आता थेट आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत झळकणार आहे .
सुशिकलाने विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे मोठे नाव केले आहे. तिच्या यशाचा चढता आलेख पाहून ग्रामीण भागात अनेक खेळाडूंमध्ये यश खेचून आणण्याची जिद्द निर्माण झाली आहे. सुशिकलाचे वडील घरबांधकाम कामगार आहेत. त्यांनी प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर आपल्या लेकींना गावाबाहेर पाठवून देशासाठी सुवर्णपदक कमावण्याची संधी मिळवून दिली आहे. मागील वर्षी हैदराबाद येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक व एक कांस्यपदक जिंकले. अलीकडेच जयपूर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत दोन सुवर्ण व एक रजत पदकाची कमाई करून सुशिकलाने महाराष्ट्राच्या सायकलिंग संघात कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडली होती. सध्या शुशिकला दिल्ली येथे पुढील स्पर्धेसाठी तयारी करत आहे. १८ ते २२ जून २0२२ दरम्यान दिल्ली येथे होणार्या एशियन चॅम्पियनशिप व २२ ते २५ सप्टेंबरदरम्यान चीनमध्ये होणार्या एशियन गेम्ससाठी तिचा अभ्यास सुरू आहे.