36.6 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home क्रीडा खजरी शाळेतील खेळाडू-विद्यार्थ्यांना क्रिडा किट मिळणार-जिप सदस्य डाॅ.भूमेश्वर पटले

खजरी शाळेतील खेळाडू-विद्यार्थ्यांना क्रिडा किट मिळणार-जिप सदस्य डाॅ.भूमेश्वर पटले

0
57

blank

स/अर्जूनी-तालुक्यातील आदिवासी विकास हायस्कूल व कला,विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय खजरी/डोंगरगाव येथील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सत्र 2022-23 मध्ये ,महाराष्ट्र शासनाच्या क्रिडा विभागाच्या वतिने आयोजित 14,17,19 वर्षवयोगटाखालील विविध पाऊसाळी क्रिडा स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेला आहे.
आदिवासी नक्षलग्रस्त भागातील खेळाडू विद्यार्थ्यांचा उत्साह वाढावा म्हणून जिप सदस्य डाॅ.भूमेश्वर पटले यांनी आपल्या व्यक्तिगत स्तरावरील कोषातून क्रिडा किट देण्याचे आश्वासन दिले.शाळेच्या वतीने आज शनिवारी प्राचार्य खुशाल कटरे यांच्या नेतृत्वात त्यांची पळसगांव येथील त्यांच्या कार्यालयात भेट घेण्यात आली.याप्रसंगी उमावि प्रभारी प्रा.वाय.टी.परशुरामकर, विज्ञान शाखा प्रभारी प्रा.संजय येळे,प्रा.कु.सी.बी.टेंभरे उपस्थित होते.

blank