एकता दौडमध्ये अनेकांचा सहभाग राष्ट्रीय एकात्मतेची दिली शपथ

0
12

वाशिम दि.31– देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आज 31 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी करण्यात आली.या दिवसाचे औचित्य साधून जिल्हा प्रशासन,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,नेहरू केंद्र आणि विविध क्रीडा संघटना यांच्या संयुक्त वतीने एकता दौडचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल येथून करण्यात आले.विधान परिषद सदस्य आमदार ऍड.किरणराव सरनाईक यांनी एकता दौडला हिरवा झेंडा दाखवून दौडचा शुभारंभ केला. यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश शिंदे,जिल्हा क्रीडा अधिकारी लता ठोसर,अरुण सरनाईक, श्री.बाकलीवाल विद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेचे विभाग प्रमुख अमोल काळे,नेहरू युवा केंद्राचे दत्ता मोहळ आणि स्काऊट – गाईडचे सदानंद शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी आमदार ऍड सरनाईक यांनी सरदार पटेल यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन केले.त्यांनी सरदार पटेल यांच्या जीवनकार्यावर मनोगतातून प्रकाश टाकला.जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती गुप्ता यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.एकता दौडमध्ये विविध शासकीय विभागाचे अधिकारी – कर्मचारी,क्रीडा प्रेमी, स्काऊट- गाईड,एनसीसीचे विद्यार्थी, पोलीस वाहतूक शाखा, पोलीस यंत्रणा, माउंट कार्मेल,जवाहर नवोदय विद्यालय, राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा, श्री.बाकलीवाल विद्यालय, मालतीबाई कन्या शाळा तसेच विविध क्रीडा संघटनेचे प्रतिनिधी तसेच नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
क्रीडा संकुल येथून एकता दौडचा शुभारंभ करण्यात आला.ही दौड बस स्टँडमार्गे,डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक,पाटणी चौक,अकोला नाका, जिल्हा सामान्य रुग्णालय मार्गे डॉ. देशमुख हॉस्पिटल चौक ते जिल्हा क्रीडा संकुल येथे दौडचा समारोप करण्यात आला.
एकता दौड यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभाग, पोलीस वाहतूक शाखा, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर,क्रीडा अधिकारी संजय पांडे,मिलिंद काटोलकर, संतोष फुपाटे, तसेच शुभम कंकाळ,भारत वैद्य यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार धनंजय वानखेडे यांनी मानले.