टीम इंडियाचं लाजिरवाणा पराभव, इंग्लंडचा 10 गडी राखून विजय

0
21

भारतीय संघाचं आव्हान अखेर संपलं आहे. इंग्लंडनं भारताला 10 गडी राखून मात दिली आहे. एडिलेडमध्ये गुरुवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडने भारतावर 10 गडी राखून मात केली. भारताने 169 धावांचे लक्ष्य दिले होते. इंग्लंडच्या सलामीवीरांनी हे लक्ष्य 16 व्या षटकात 10 च्या रनरेटने पूर्ण केले. त्यामुळे भारताने प्रथम फलंदाजी केली. कोहली आणि पांड्याच्या जोडीच्या मदतीनं 168 धावा भारतानं स्कोरबोर्डवर लावल्या. पण इंग्लंडनं फलंदाजीला येत सुरुवातीपासून तुफान फटकेबाजी करत 16 षटकांत 170 धावा स्कोरबोर्डवर लावल्या आणि तब्बल 10 गडी राखून विजय मिळवला.

अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात भारताला आधी नाणेफेक गमवावी लागली. ज्यानंतर मात्र इंग्लंडने नाणेफेक जिंकल्याचा फायदा घेत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात यावं लागलं. सलामीवीर केएल राहुल अगदी स्वस्तात 5 धावा करुन तंबूत परतला. तर रोहितने मात्र 27 धावांची खेळी केली, पण तो देखील मोठी खेळी करु शकला नाही आणि भारताला दुसरा झटका बसला. ज्यानंतर कोहली आणि सूर्या आजही दम दाखवतील असं वाटत असताना सूर्यकुमार 14 धावांवर बाद झाला. पण कोहली मात्र एकहाती झुंज देतच होता. पांड्याने त्याला संथगतीने साथ दिली. मग कोहली 50 धावा करुन बाद होताच पांड्याने गिअर अप करत फटेकबाजी सुरु केली. त्याने 33 चेंडूत 63 धावा ठोकल्या पण शेवटच्या चेंडूवर तो चूकीने हिटविकेट झाला ज्यामुळे भारतीय डावाचा अखेरचा चेंडू निर्धाव राहिला. ज्यामुळे भारताने 168 धावा केल्या आणि इंग्लंडला विजयासाठी 169 धावांची गरज होती.

बटलर-हेल्स जोडी भारतावर तुटून पडली

169 धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या इंग्लंडने सुरुवातीपासून स्फोटक फलंदाजी सुरु ठेवली. कर्णधार जोस बटलर आणि अॅलेक्स हेल्स यांनी पहिल्या ओव्हरपासून चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत धावसंख्या वाढवत ठेवली. बटलरने 49 चेंडूत नाबाद 80 धावा तर हेल्सने 47 चेंडूत नाबाद 86 धावा केल्या. ज्यामुळे अवघ्या 17 षटकातंच त्यांनी हे आव्हान पार करत सामना खिशात घातला. भारताच्या एकाही गोलंदाजांला चांगली गोलंदाजी करता आली नाही. सर्वच बोलर्सना इंग्लंडच्या बटलर-हेल्स जोडीनं धुतलं. सामनावीर म्हणून इंग्लंडचा सलामवीरी अॅलेक्स हेल्सला सन्मानित करण्यात आलं.

हार्दिकचा पॉवर प्ले
विराट कोहली बाद झाल्यानंतर हार्दिक पंड्याने जोरदार फलंदाजी केली. त्याने 33 चेंडूत 63 धावा केल्या. हार्दिकचा स्ट्राईक रेट 190 होता. एका क्षणी 150 पेक्षा कमी धावसंख्येवर आटोपती टी इंडियाला हार्दिकने दमदार खेळीने 168 धावांपर्यंत नेले. त्याने 4 चौकार आणि 5 षटकार मारले.

टीम इंडियाच्या 3 चुका…

1. केएल राहुल लवकर बाद
दुसऱ्या षटकात केएल राहुलने ख्रिस वोक्सला विकेट दिली. त्याने चेंडू बाहेर कीपरकडे दिला. येथून दबाव वाढला आणि पॉवर प्लेमध्ये फलंदाजी संथ राहिली.

2. सेट झाल्यावरही रोहितने विकेट दिली
ओपनिंगला आलेला रोहित शर्मा 9व्या षटकात 27 धावा काढून बाद झाला. मग गरज होती की त्यांनी किमान 15 षटके फलंदाजी करावी.

3. सुर्याचा गेमप्लॅन अयशस्वी
आदिल रशीदने चांगली गोलंदाजी केली. त्याने 4 षटकात फक्त 20 धावा दिल्या. आपल्या शेवटच्या षटकात सूर्याने आक्रमक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला आणि तो बाद झाला.

रोहित पुन्हा फ्लॉप…
या विश्वचषकात रोहित शर्माने 6 सामन्यात 116 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने केवळ एकच अर्धशतक केले. त्याने उपांत्य फेरीत 28 चेंडूत 27 धावा केल्या. स्ट्राइक रेट 100 पेक्षा कमी होता.