जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलाव सुरु

0
2

गोंदिया, दि.27 : जिल्हा क्रीडा संकुल गोंदिया येथील जलतरण तलावाच्या दुरुस्तीचे अद्ययावतीकरणाचे काम सुरु होते, त्यामुळे जलतरण तलाव काही दिवस बंद होता. सदर जलतरण तलावाचे काम आता पूर्ण झाले असून 26 मार्च 2024 रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे यांच्या हस्ते जलतरण तलावाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी क्रीडा अधिकारी अनिराम मरसकोले, जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव अनिल शहारे, तायक्वांदो असोसिएशनचे सचिव दुलीचंद मेश्राम, पारुल ॲक्व्याटिक असोसिएशनचे संस्थापक अनिल पांडे यांचेसह आकाश भगत व जयश्री भांडारकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. तरी जिल्ह्यातील जलतरणपटू व समस्त नागरिकांनी आपल्या नावाची नोंद करुन जलतरण तलावाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे यांनी केले आहे.