राज्सस्तर बास्केटबॉल, रोलबॉल क्रीडा स्पर्धेसाठी 624 खेळाडूंचा सहभाग

0
8

गोंदिया,दि.30 : गोंदिया जिल्हा क्रीडा संकुलावर पहिल्यांदाच राज्यस्तरीय बास्केटबॉल 14 वर्ष मुले/मुली व रोलबॉल 17 व 19 वर्ष मुले/मुली वर्षाखालील वयोगटातील मुला-मुलींच्या स्पर्धा दिनांक 1 फेब्रुवारी 2023 पासून सुरु होत आहेत. राज्यातील आठ विभागातून 48 संघामध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. सरकार मान्य 18 क्रीडा प्रकारातील विभागीय स्तरावरील स्पर्धा घेण्याचा बहुमान गोंदिया जिल्ह्यास यावर्षी मिळाला आहे.

       क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या वतीने जिल्हा अधिकारी-जिल्हा क्रीडा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय बास्केटबॉल/रोलबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन दिनांक 1 ते 3 फेब्रुवारी 2023 दरम्यान करण्यात येणार असून जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर होणाऱ्या या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी राज्यातील आठ क्रीडा विभागातून बास्केटबॉल 14 वर्ष मुले/मुली करीता 176 व रोलबॉल 17 व 19 वर्ष मुले-मुली करीता 448 असे मिळून एकूण 624 खेळाडू, त्यांचे संघ व्यवस्थापक आणि मार्गदर्शक सहभागी होणार आहेत. तरी जिल्ह्यातील खेळाडू, क्रीडाप्रेमी व नागरिकांनी या स्पर्धेचा आनंद घ्यावा. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड यांनी केले आहे.