शिक्षक मतदारांचा उत्साह अन मतदानासाठी रांगा!

0
22

गोंदिया/भंडारा दि. 30:  विधानपरिषद नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. मतदानाला शांततेत सुरुवात झाली असून मतदानासाठी शिक्षकांचा उत्साह हा शिगेला पोहोचल्याचे आज पहायला मिळाला. आज सकाळपासूनच गोंदिया भंडारा जिल्ह्यातील  मतदान केंद्रांवर मतदानासाठी रांगा पहायला मिळाल्या.

विधानपरिषदेच्या शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी नागपूर विभागातील एकूण सहा जिल्ह्यांमध्ये 124 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. यात भंडारा  जिल्ह्यातील 12 मतदान केंद्रांवर व गोंदिया जिल्ह्यातील 10 मतदान होत असून 7 हजार शिक्षक मतदानाचा हक्क बजावणार आहे. सकाळी आठ वाजेपासून जिल्ह्यातील सर्वच मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली.  शिक्षक मतदारांचा उत्साह मतदानासाठी दिसून आला.

मतदानाला सकाळी आठ वाजताचा सुरुवात झाल्यानंतर शिक्षक मतदार यायला सुरुवात झाली. मतदान कसे करावे, उमदेवारांची माहिती मतदान केंद्रांबाहेर दर्शनी भागात लावण्यात आली होती. प्रत्येक मतदान केंद्रांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त पहायला मिळाला.  निवडणुकीत 22 उमेदवार आपले नशीब आजमावणार आहे.

नागपूर शिक्षक मतदार संघ निवडणूक
दहा मतदान केंद्रावरील मतदानाची टक्केवारी
58-Gondia turnout sa far 75%
57- Dawaniwada 77%
56-Tiroda 89%
59-Amgaon 93%
60- Salekasa 93%
61- Goregaon 94%
62 -Sadak Arjuni 91%
63- Deori 94.26%
64- Navegaon bandh 92%
65 -A Morgaon 93%