जिल्हास्तरीय दिव्यांग विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन

0
9

 98 दिव्यांग विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक स्पर्धेत घेतला भाग

           गोंदिया,दि.17 :  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय गोंदिया , समग्र शिक्षा, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया, शिक्षण विभाग प्राथमिक व माध्यमिक, जिल्हा परिषद गोंदिया व नॅशनल असोसिएशन फाॅर द ब्लाइन्ड ऍक्टिव्हिटी सेंटर गोंदिया आणि सहयोग हॉस्पिटल गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने 13 फेब्रुवारी  रोजी जिल्हास्तरीय दिव्यांग विद्यार्थी सांस्कृतिक स्पर्धेच्या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे, गोंदिया येथे करण्यात आले.

           कार्यक्रमाचे उद्घाटन म्हणून न्यायाधीश ए.टी.वानखेडे व कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य राजेश रुद्रकार होते. तसेच शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. महेंद्र गजभिये, समाज कल्याण अधिकारी संजय गणवीर, न्यायाधीश सकलेश पिंपळे व प्राध्यापक डॉ. शशिकांत चौरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
दिव्यांग मुला-मुलींनी स्वतःला कमजोर व एकाकी समजू नये. कोणत्याही क्षेत्रात दिव्यांगांना बरोबर मोजले जातात व तशी कायद्यामध्ये देखील तरतूद आहे. तुम्ही खूप अभ्यास करावे व मेहनत करून पुढे जावे. तसेच तुम्हाला कायद्याबद्दल माहिती व काही मदत लागल्यास जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय गोंदिया सदैव तुमच्या पाठीशी आहे, असे न्यायाधीश ए.टी.वानखेडे यांनी सांगितले.

         समाजात दिव्यांग व्यक्तींच्या तसेच या देशाला त्यांची गरज आहे व त्यांनी स्वतःला कुठेही कमी आखु नये व खूप अभ्यास करून समोर जिल्हाधिकारी, न्यायाधीश, पोलीस अधीक्षक किंवा मोठे अधिकारी बनावे असे अध्यक्षीय भाषणामध्ये राजेश रुद्रकार यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
दिनांक 13 फेब्रुवारी 2023 रोजी सामाजिक न्याय भवन, गोंदिया येथे घेण्यात आलेल्या या दिव्यांग सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये गोंदिया जिल्ह्यातील एकूण आठ तालुक्यातील 98 दिव्यांग विद्यार्थ्यांनी (इयत्ता १ ते १० पर्यंतचे) भाग घेतले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दिव्यांग विद्यार्थ्यांचा पारितोषिक स्वरुपात स्मृतीचिन्ह, शिल्ड व मेडल देऊन गौरव करण्यात आला.

        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निरूशा चौरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार रमेश मोज यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद गोंदिया, सहयोग हॉस्पिटल गोंदिया तसेच नमाद विद्यालय, शासकीय विद्या तंत्रनिकेतन व एम.एस.आयुर्वेदिक कॉलेज या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वयंसेवकाची भूमिका पार पाडली .