सरंक्षित वनक्षेत्रात अवैध खोदकाम प्रकरणी कार्य.अभियंतासह अभियंत्यावर गुन्हा दाखल

0
30

ग्रंडर चालकास 28 फेबुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी

गोंदिया,दि.17ः गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत येत असलेल्या पुराडा ते मालेवाडा या राज्यमार्गावरील कक्ष क्रमांक 1040 मधून जाणार्या रस्त्याच्या दोन्ही कडेला अवैधरित्या वनविभागाच्या जागेतून मुरूमाचे उत्खनन करुन रस्त्याच्याकडेला अवैधरित्या पसरवून काम केल्याप्रकरणी वनविभागाने सार्वजनिक बांधकाम विभाग 1 गडचिरोलीचे कार्यकारी अभियंता,उपविभागीय अभियंता व शाखा अभियंत्यासह ग्रंडर चालक राजू रविदास याच्याविरुधद् वनकायदयातंर्गत गुन्हा नोंदवल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे.वनपरिक्षेत्र अधिकारी बी.एच.डिगोळे यांनी यासंदर्भात गु्न्हा सरंक्षित वनक्षेत्रात खोदकाम केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून ग्रंडर जप्त करुन चालक राजू रविदास यास न्यायालयात हजर केले.त्यावर कुरखेडा येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांनी चौकशीच्या उद्देशाने ग्रंडर चालक राजू रविदास यास 28 फेबुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावत नागपूर तुरुंगात रवानगी केली.