जागतिक महिला दिनानिमीत्त महिलांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन

0
8

   गोंदिया, दि.7 : क्रीडा व युवक संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद, नेहरु युवा केंद्र, भारत स्काऊट-गाईड, अथर्व बहुउद्देशीय संस्था व जिल्ह्यातील विविध संघटनाच्या माध्यमातून दिनांक 8 मार्च 2023 रोजी जागतिक महिला दिनाचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल, मरारटोली, गोंदिया येथे आयोजित करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमांतर्गत रोलर स्केटींग, ॲथलेटिक्स, ज्युदो, बास्केटबॉल, स्क्वॅश, सायकलींग, टेबलटेनीस, योगासन, रस्सीखेत्र, क्रिकेट, कबड्डी या खेळांच्या क्रीडा स्पर्धा महिलांसाठी वयोमर्यादा 30, 40 व 50 वर्ष वयोगटामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.

         तरी 8 मार्च या जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात गोंदिया शहरातील विविध संघटनेतील, शासकीय कार्यालयातील, शालेय विद्यार्थींनी, महाविद्यालयीन युवती व विविध स्तरावर काम करणाऱ्या महिलांनी मोठ्या संख्येने सदर कार्यक्रमात सहभागी व्हावे. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड यांनी केले आहे.