तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत अभिनव विद्या मंदिरचे सुयश

0
4
वाढदिवसाच्या शुभेच्छा

#१४ वर्ष वयोगट कबड्डी स्पर्धेत जिल्ह्यात दाखल

सालेकसा- तालुक्यातील अभिनव विद्यामंदिर शाळा विद्यार्थ्यांच्या क्रीडा शैलीला नेहमीच प्राधान्य देत असते. शाळेतील विद्यार्थी वेगवेगळ्या शालेय स्पर्धेत भाग घेऊन अग्रेसर असताना दिसतात. नुकत्याच झालेल्या तालुकास्तरीय शालेय कबड्डी टूर्नामेंट मध्ये 14 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांनी बाजी मारत जिल्ह्यात मजल मारली आहे. एकलव्य क्रीडा संकुल सालेकसा येथील पटांगणावर या खेळांचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. 14 वर्षे वयोगट कबड्डी स्पर्धेत तालुकास्तरीय पारितोषिक पटकावत अभिनव विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय कबड्डी टूर्नामेंट मध्ये प्रवेश नक्की केला आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या यशाचे श्रेय त्यांचे आई-वडील व मुख्याध्यापक शैलेश माहुले यांना दिले तर क्रीडा शिक्षक गोल्डी भाटिया यांनी परिश्रम घेतले.