राज्यस्तरीय शालेय तलवारबाजी क्रीडा स्पर्धेचे थाटात उद्घाटन

0
9

सातत्यपूर्ण सराव केल्यास स्पर्धेत निश्चितच यश प्राप्त – प्रकाश काटुले

      गोंदिया, दि.3 : शालेय स्पर्धेमधून दर्जेदार खेळाडू निर्माण होण्याची प्रक्रिया होत असून यामधून भविष्यातील आंतरराष्ट्रीय खेळाडू घडणार आहेत. स्पर्धेत सहभागी होतांना खेळाडूंनी आत्मविश्वासाने स्पर्धेत उतरावे. सातत्यपूर्ण सराव केल्यास स्पर्धेत निश्चितच यश प्राप्त होते, असे प्रतिपादन महाराष्ट्र फेन्सींग असोसिएशनचे कार्यकारी उपाध्यक्ष प्रकाश काटुले यांनी केले.

       2 नोव्हेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल, गोंदिया येथे राज्यस्तरीय शालेय तलवारबाजी क्रीडा स्पर्धेचे महाराष्ट्र फेन्सींग असोसिएशनचे कार्यकारी उपाध्यक्ष प्रकाश काटुले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

        कार्यक्रमास छत्रपती अवार्डी बुलढाणा शेषनारायण लोढे, महाराष्ट्र फेन्सींग असोसिएशनचे उपाध्यक्ष सुनिल कुरंजेकर, फेन्सींग असोसिएशन गोंदियाचे अध्यक्ष पुष्कर सावंत, फेन्सींग असोसिएशन गोंदियाचे उपाध्यक्ष शैलेंद्र फुंडे, छत्रपती  अवार्डी लातुर दत्ता गलाले, छत्रपती अवार्डी नाशिक राजु शिंदे, छत्रपती  अवार्डी संभाजीनगर दिनेश वजारे, छत्रपती अवार्डी संभाजीनगर सागर मगरे, छत्रपती अवार्डी संभाजीनगर तुषार आहेर, छत्रपती अवार्डी नागपूर नंदकुणाल धनविजय, संदेश भागवत, केदार ढवळे, अभिजित मोरे, विजय जाधव, दिपक क्षीरसागर, सोयल वकील, श्रीमती झोरे, जिल्हा क्रीडा अधिकारी चारुदत्त नाकट, राज्य क्रीडा मार्गदर्शक एन.एस.उईके, क्रीडा अधिकारी ए.बी.मरस्कोले यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.

         क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या वतीने 1 ते 4 नोव्हेंबर 2023 पर्यंत जिल्हा क्रीडा संकुल गोंदिया येथे राज्यस्तरीय शालेय तलवारबाजी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

       सदर स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आले. प्रोग्रेसीव्ह इंग्लीश स्कुल गोंदिया विद्यार्थ्यांच्या वतीने स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

       प्रास्ताविकेतून जिल्हा क्रीडा अधिकारी चारुदत्त नाकट यांनी सदर स्पर्धेचा उद्देश विशद करुन खेळाडूंनी नियमांचे पुर्णत: पालन करावे तसेच स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षीत आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

       कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी प्रोग्रेसीव्ह इंग्लीश स्कुल गोंदिया च्या विद्यार्थ्यांनी अतिशय आकर्षक नृत्य सादर करुन सर्वांचे लक्ष वेधले. राष्ट्रीय खेळाडू अवदुत दोरगे यांनी खेळाडुंना शपथ दिली.

      कार्यक्रमाचे सुत्रसंचालन क्रीडा अधिकारी ए.बी.मरसकोले यांनी केले, तर उपस्थितांचे आभार राज्य क्रीडा मार्गदर्शक एन.एस.उईके यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारत स्काऊट-गाईडच्या जिल्हा समन्वयक चेतना ब्राम्हणकर, रविंद्र वाळके, विकास कापसे, अंकुश गजभिये, अतुल बिसेन, विनेश फुंडे, शिवचरण चौधरी, किसन गावड, आकाश भगत, नरेंद्र कोचे, शेखर बिरणवार, जयश्री भांडारकर व संबंधित खेळाचे क्रीडा शिक्षक व पंच उपस्थित होते.