ज्युनियर आंतरराष्ट्रीय टेनिसपटू प्रणव कोरडेची बांग्लादेशातील टेनिस टुर्नामेंटमध्ये चमकदार कामगिरी

0
3

छत्रपती संभाजीनगर,दि.06- बांग्लादेशची राजधानी ढाका येथे होत असलेल्या जागतिक दर्जाच्या चौथीसावी बांग्लादेश टेनिस टूर आयटीआय ज्युनियर टेनिस टूर्नामेंट J30 (इंटरनॅशनल टेनिस फेडरेशन द्वारा आयोजित )मध्ये छत्रपती संभाजीनगर येथील प्रणव कोरडे या खेळाडूंने चमकदार कामगिरी केली आहे.ज्युनियर फाईव्ह टूर्नामेंट मध्ये इंडुरन्स मराठवाडा टेनिस सेंटरचा आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रणव कोरडे याने थायलंडचा अव्वल मानांकित आंतरराष्ट्रीय रँकिंग खेळाडू पुडीत फाफटसिरीकुल याचा टेनिस सिंगल( एकेरीच्या) मॅच मध्ये ४-६,६-३,६-४ असा पराभव करुन विजय मिळवित दुसऱ्या फेरीत (राउंड) प्रवेश केला.प्रणवचा पुढील सामना उद्या अमेरिकेचा USA एक नंबर सीडचा खेळाडू अर्णव अड्डा याच्याबरोबर होणार आहे. प्रणव कोरडे याचे इंडुरन्स मराठवाडा एमएसएलटीए सेंटरने स्वागत केले आहे. प्रणव कोरडे हा गजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. प्रणवला इंडुरन्स कंपनीने पुढील मॅचेससाठी शुभेच्छा दिल्या आहेत.