तिरोडा : तालुक्यातील खोपडा या गावात अर्जंनविस म्हणून कार्यरत असलेले शेषराम भोजराज मरघडे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मित मृत्यू झाला. श्री. मरगडे यांचे अचानक निधन झाल्यामुळे त्यांच्या परिवारावर अस्मानी संकट आलेले आहे. कारण संसाराची गाडी चालवणारे ते एकटे कर्ते पुरुष होते. त्यांच्या मागे त्यांची पत्नी आणि तीन मुली असा आप्त परिवार आहे. ही बाब तलाठी राजू तईकर ह्यांना कळताच त्यांनी त्वरित श्री. मरघडे याचे घर गाठले व त्यांच्या मुलींना स्वखर्चातून शैक्षणिक साहित्य व इतर उपयोगी वस्तू दिवाळीनिमित्त भेट केली. एवढेच नाही तर त्यांनी संजय गांधी निराधार योजनेचे अर्ज, शेतीचे फेरफार हे सुद्धा समाज कल्याण विभागाकडून त्वरित करून दिले. ह्या प्रसंगी रमेश भगत,सुनील प्रजापती, कोतवाल यशवंत चामट सुध्धा उपस्थित होते.राजू तईकर हे गांगला येथील तलाठी असून त्यांचं अनाथांवर एक वेगळीच माया आहे आणि ते गोर गरिबांना नेहमीच मदत करत असतात, असे गावकरी नेहमीच बोलत असतात.
ह्या मातीनं आपल्याला बरेच काही दिले आहे , आपल्याला ते ऋण चुकवायचे असते असे प्रतिपादन श्री राजू तईकर यांनी केले.मा.तहसिलदार गजानन कोकुडे तिरोडा यांच्या सहकार्याने काम पूर्ण केले.