प्रणव कोरडेला टेनिस एकेरीत विजेते पदासह मानांकन

0
6

संभाजीनगर,–दि. ९ व १० डिसेंबर रोजी वंदे मातरम प्रतिष्ठान व टेनिस प्रीमियर लिग यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे नुकत्याच झालेल्या खुले पुरुष एकेरी, खुले पुरुष दुहेरी व महिला एकेरी अशा चार गटात स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत औरंगाबाद, नागपुर, मुंबई, पुणे, जळगांव, धुळे तसेच नाशिक अशा १०४ स्पर्धकांनी सहभाग घेतला. (औरंगाबादच्या) छत्रपती संभाजीनगरचा *प्रणव कोरडे* याने नाशिकच्या वेदांत पवारचा पुरुष एकेरीत ६.० असा सरळ पराभव करुन मानांकन मिळविले. पुरुष दुहेरीमध्ये प्रणय पाटील व रोहन मुरई यांनी युवराज गावित व मयूर खरोटे यांचा ६.२ असा पराभव करुन दुहेरी मानांकन मिळविले. महिला एकेरीमध्ये नाशिकची भक्ती ताजणे हिने नाशिकच्याच गौरी आगळेचा ६.३ असा पराभव करत मानांकन मिळविले. १४ वर्षाखालील मुला-मुलींमध्ये

सिध्दार्थ परांजपे याने तेजस कापडणे याचा ६.३ व अनन्या पाटील हिने आर्या पाठक हिचा ६.५ (७-३) असा पराभव केला.

स्पर्धेचे सूत्रसंचालन गोविंद साळुंके व मकरंद जाधव यांनी तर स्पर्धेचे कामकाज मंगेश धुमाळ, अशोक दाबाडे, वैभव दादा कुलकर्णी, सन्नु जोसेफ यांनी पाहिले. स्पर्धेला सतीश नाना कुलकर्णी (माजी महापौर) व संध्याताई कुलकर्णी (अध्यक्ष, वंदे मातरम् प्रतिष्ठान) यांच्या मार्गदर्शन लाभले. तर प्रमुख पाहुणे म्हणून राजीव देशपांडे (व्हा. चेअरमन, महाराष्ट्र स्टेट, लॉन टेनिस असोसिएशन तसेच अध्यक्ष नाशिक जिल्हा टेनिस संघटना) एकनाथ किनीकर (खेळाडु ऑल इंडिया सिनियर असोसिएशन) नारायण महाजन (जनरल मॅनेजर, ग्लेनमार्क कंपनी) गोविंद साळुंके (स्पर्धा निरीक्षक), मिलिंद करंजे आदी उपस्थित होते.