एस.एस.जायस्वाल महाविद्यालयात वार्षिकोत्सव निमित्त विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन

0
2

अर्जुनी मोर.-शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालयात वार्षिकोत्सव 2024 निमित्त विविध क्रीडा स्पर्धांचे उद्‌घाटन दिनांक 7 फेब्रुवारीला श्री दुर्गा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा लुणकरनजी चितलांगे यांच्या अध्यक्षतेखाली व संस्था उपाध्यक्ष  बद्रीप्रसाद जायस्वाल,प्राचार्य डॉ ईश्वर मोहुर्ले,आय.क्यू.ए.सी समन्वयक डॉ के.जे. सीबी, वार्षिकोत्सव प्रभारी डॉ शरद मेश्राम, सह प्रभारी डॉ गोपाल पालीवाल तसेच प्रभारी क्रीडा शिक्षक प्रा राजेश डोंगरवार आणि क्रीडा समितीतील सर्व सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. प्रा डोंगरवार यांनी क्रीडा उत्सव आयोजनामागील आपली भूमिका विशद केली या निमित्ताने संस्था अध्यक्ष लुणकरण चितलांगे , संस्था उपाध्यक्ष बद्रीप्रसाद जायस्वाल आणि प्राचार्य डॉ ईश्वर मोहुर्ले यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा प्रदान केल्या.
सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कबड्डी क्रीडांगणचे पूजन करण्यात आले. उद्घाटकीय सामना कबड्डीचा घेण्यात आला . कार्यक्रमाचे संचालन समिती सदस्य प्रा यात्रिक भगत यांनी तर आभारप्रदर्शन समिती सदस्य डॉ मनोज बांगडकर यांनी केले.उद्घाटकीय कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
या क्रीडा महोत्सवात अनेक खेळ जसे कबड्डी कॅरम क्रीकेट व्हॉलीबॉल खो खो , इ. खेळ खेळण्यात येणार आहे.वार्षिकोत्सव अंतर्गत घे भरारी सांस्कृतिक कार्यक्रम १५ ते १७ फेब्रुवारी दरम्यान होणार आहे.