Home क्रीडा नागपूर परिमंडलातील विजेत्या खेळाडूंचा सत्कार

नागपूर परिमंडलातील विजेत्या खेळाडूंचा सत्कार

0

नागपूर, दि.16:  छत्रपती  संभाजीनगर येथे नुकत्याच पार पडलेल्या महावितरणच्या आंतरपरिमंडलीय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत नागपूर परिमंडलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवून मौलिक कामगिरी केली, त्यांचा नागप[ऊर परिमंडल कार्यालयात प्रादेशिक संचालक सुहास रंगारी व मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या स्पर्धेत सुवर्ण पदक विजेते निलेश बनकर (बुद्धीबळ एकेरी), पुष्पलता हेडाऊ (कॅरम), रितिका नायडू (बॅडमिंटन एकेरी), मनीषा चोकसे (टेनिकॉइट एकेरी) आणि रीतिका नायडू, विणा सगदेव, मनीषा चौकसे व प्रणाली गायकी (बॅडमिंटन सांघिक) याचसोबत रोप्य पदक विजेते रीतिका नायडू, विणा सगदेव, मनीषा चौकसे व नेहा हेमने (कॅरम सांघिक), मनीषा चौकसे, रीतिका नायडू, प्रज्ञा वंजारी व समिधा लोहारे (टेनिकॉइट सांघिक), समिधा लोहारे व प्रज्ञा वंजारी (टेनिकॉइट दुहेरी) आणि प्रशांत ठकरे व धिरज मनपे (ब्रीज सांघिक) या खेळाडूंचा सत्कार प्रादेशिक संचालक सुहास रंगारी व मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपमहाव्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) प्रमोद खुळे, उपमुख्य औद्योगिक सबंध अधिकारी सचिन लहाने, वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त व लेखा) अनुजा पात्रीकर, कार्यकारी अभियंता समीर शेंद्रे व उपमुख्य जनसंपर्क अधिकारी योगेश विटनकर उपस्थित होते.

Exit mobile version