धकाधकीच्या जीवनामध्ये संघर्ष करुन आव्हाने स्विकारण्यासाठी तयार रहा- रोहिणी बानकर

0
72
  • राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा

गोंदिया, दि.30 : देशाची जडण-घडण व प्रगती साध्य करायची असेल तर धकाधकीच्या जीवनामध्ये संघर्ष करुन आव्हाने स्विकारण्यास तयार रहा, असे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बानकर यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या उद्घाटन प्रसंगी केले.

        क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने 29 ऑगस्टला मेजर ध्यानचंद यांच्या जन्म दिनानिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिनाचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल गोंदिया येथे करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून चेतना ब्राम्हणकर, पराग खुजे, रविंद्र वाळके, विकास कापसे, डॉ.आनंद मखवाना, दिपक सिक्का, शैलेश बघेले, अंकुश गजभिये, विशाल ठाकुर, मिलिंद रहांगडाले, जागृत सेलोकर, माधुरी परमार उपस्थित होते.

       अध्यक्षीय भाषणातून जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे यांनी हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्यापासून नवोदित खेळाडूंनी प्रेरणा घ्यावी व स्वाभिमानी वृत्तीने देशासाठी खेळावे असे आवाहन केले.यावेळी चेतना ब्राम्हणकर, डॉ.आनंद मकवाना, विकास कापसे यांनी मेजर ध्यानचंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकला व खेळ तसेच व्यायामाचे महत्व विशद केले.

         सदर कार्यक्रमांतर्गत 29 ऑगस्ट रोजी सकाळी बालाघाट रोड ते जिल्हा क्रीडा संकुल मरारटोली या मार्गाने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या मुख्य कार्यक्रमात सन 2023-24 या वर्षात राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग व प्राविण्य प्राप्त खेळाडू परिधी बिसने (तलवारबाजी) स्वर्ण पदक शिष्यवृत्ती 11250 रुपये, सिध्दार्थ हेमणे (वुशु) सहभाग शिष्यवृत्ती 3750 रुपये, छबेली राऊत (बेसबॉल) कांस्य पदक शिष्यवृत्ती 6750 रुपये, हर्षल रक्षा (तायक्वांदो) कांस्य पदक शिष्यवृत्ती 6750 रुपये, पोर्णिमा उईके (ॲथलेटिक) सहभाग शिष्यवृत्ती 3750 रुपये, लिना कोहळे (ॲथलेटिक) सहभाग शिष्यवृत्ती 3750 रुपये व सन्मानचिन्ह देऊन अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

         सन 2023-24 या शैक्षणिक क्षेत्रात गोंदिया जिल्ह्यातील शालेय क्रीडा स्पर्धेत गुणानुक्रमे प्राविण्य प्राप्त प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या शाळांना प्रोत्साहनात्मक अनुदान मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. यामध्ये 14 वर्षे मुले-मुली– साकेत पब्लिक स्कुल गोंदिया प्रथम (प्रो.राशी 83540), विवेक मंदिर गोंदिया द्वितीय (प्रो.राशी 62654), स्टार इंटरनॅशनल गोंदिया तृतीय (प्रो.राशी 41770). 17 वर्षे मुले-मुली– सी.एम.पी. इंग्रजी हायस्कुल गोंदिया प्रथम (प्रो.राशी 83540) शहिद मिश्रा हायस्कुल तिरोडा द्वितीय (प्रो.राशी 62654), विवेक मंदिर गोंदिया तृतीय (प्रो.राशी 41769). 19 वर्षे मुले-मुली– एन.एम.डी. कॉलेज गोंदिया प्रथम (प्रो.राशी 83540), साकेत पब्लिक स्कुल गोंदिया द्वितीय (प्रो.राशी 62654), मनोहर मिल्ट्री स्कुल गोंदिया तृतीय (प्रो.राशी 41770).

         कार्यक्रमाचे संचालन क्रीडा अधिकारी ए.बी.मरस्कोले यांनी केले, तर उपस्थितांचे आभार पराग खुजे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आकाश भगत, जयश्री भांडारकर, शिवचरण चौधरी, किसन गावड, शेखर बिरनवार, निकीता बोरकर, रवि परिहार यांनी परिश्रम घेतले.