गोंदिया, दि.30 : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 1 जुलै 2024 च्या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादी दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमानुसार 30 ऑगस्ट 2024 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीतील मतदाराची एकूण संख्या 11 लाख 11 हजार 513 असून यामध्ये 5 लाख 48 हजार 227 पुरुष, 5 लाख 63 हजार 274 स्त्री व इतर 12 मतदारांचा समावेश आहे.
63-अर्जुनी मोरगाव मतदार संघामध्ये 2 लाख 56 हजार 953 मतदार आहेत. यामध्ये 1 लाख 28 हजार 194 पुरुष तर 1 लाख 28 हजार 758 स्त्री व इतर 1 यांचा समावेश आहे. 64-तिरोडा मतदार संघामध्ये 2 लाख 67 हजार 431 मतदार आहेत. यामध्ये 1 लाख 31 हजार 351 पुरुष तर 1 लाख 36 हजार 80 स्त्री व इतर शून्य यांचा समावेश आहे. 65-गोंदिया मतदार संघामध्ये 3 लाख 20 हजार 337 मतदार आहेत. यामध्ये 1 लाख 55 हजार 920 पुरुष तर 1 लाख 64 हजार 408 स्त्री व इतर 9 मतदारांचा समावेश आहे. 66-आमगाव एस.टी. राखीव मतदार संघामध्ये 2 लाख 66 हजार 792 मतदार आहेत. यामध्ये 1 लाख 32 हजार 762 पुरुष तर 1 लाख 34 हजार 28 स्त्री व इतर 2 यांचा समावेश आहे.
सदर अंतिम मतदार यादी जिल्हा निवडणूक कार्यालय गोंदिया, संबंधित विधानसभा मतदार संघ 63-अर्जुनी मोरगाव, 64-तिरोडा, 65-गोंदिया व 66-आमगाव (ST) येथे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय व सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार यांचे कार्यालय तसेच संबंधित मतदान केंद्रावर प्रसिध्द करुन सर्वसामान्य नागरिकांकरिता उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी किरण अंबेकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.