वाशिम, दि. 30 ऑगस्ट : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वाशिम यांच्या संयुक्त वतीने हॉकीचे जादुगर मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिवस २९ ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणुन दरवर्षी साजरा केला जातो. यावर्षी देखील राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सन 2023-2024 या शैक्षणिक वर्षामध्ये ज्या खेळाडुंनी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत पदक प्राप्त केले आहे. अशा खेळाडुंचा व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत सांघिक प्रकारात विजयी संघाचा व ज्यांनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभाग किंवा प्राविण्य प्राप्त केले अशा खेळाडुंचा सत्कार व सन २०२४ या वर्षात निवृत्त क्रीडा शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. तसेच ५ टक्के खेळाडु आरक्षणाअंतर्गत शासकीय सेवेत रुजू झालेल्या खेळाडुंचा सत्कार समारंभ कार्यक्रम २९ ऑगस्ट रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथील बहुउद्देशीय समागृहात संपन्न झाला.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमदार किरणराव सरनाईक यांची उपस्थिती होती. यावेळी शिक्षणाधिकारी (माध्य.) राजेद्र शिंदे, जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता, प्राचार्य धनंजय वानखेडे, राज्य क्रीडा मार्गदर्शक किशोर बोडे, क्रीडा अधिकारी मारोती सोनकांबळे, राज्य क्रीडा मार्गदर्शक अक्षय टेभुर्णीकर, विजय बोदडे, पाडुंरंग गादेकर, सामाजिक कार्यकर्ते अरविंद मानशेटवार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी श्री. सरनाईक यांनी खेळाडुंनी मेहनत व जिद्दीच्या भरवशावर आंतरराष्ट्रीयस्तरावर कसे जाता येईल याबद्दल योग्य प्रशिक्षकाकडून मार्गदर्शन घेण्याचे आवाहन केले.
नुकतेच थायलंड येथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत भारतीय संघाकडून खेळतांना आयुष्का गादेकर या खेळाडुंने सुवर्ण पदक प्राप्त केल्याबद्दल तिच्या आई वडीलांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी राज्यस्तरावर शालेय क्रीडा स्पर्धेत प्राविण्य मिळविलेले संघ कोकलगांव येथील स्वामी विवेकानंद विद्यालयाला कबड्डी या खेळप्रकारात द्वितीय क्रमांक, मानोरा येथील राष्ट्रमाता इंदिरा गांधी कन्या शाळेला कबड्डी या खेळात द्वितीय क्रमांक आणि मंगरुळपीर येथील पार्वतीबाई नाईककन्या शाळेला आट्यापाटया या खेळामध्ये प्रथम क्रमांक पटकाविल्या बद्दल सत्कार करण्यात आला.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत किकबॉक्सींग या स्पर्धेत भाग्यश्री चिगनकर, ऋतुजा कपाले, प्रणव राजेश गोटे, सृष्टी गजानन नरोटे, हर्षल विजय मनवर, सॉफ्ट टेनिसमध्ये सिसोदिया अनन्या व केशव शिंदे, बैंडमिटनमध्ये गजानन कुन्हे, शिवदास भेंडेकर, ऋत्विक देवकते, सारंग रोकडे, जय आखरे, भक्ती महाडीक, कबड्डीमध्ये सोनल ढगे, श्रेया गाडेकर, गुंजन चव्हाण, परम झाडे व सर्वज्ञा पांडे, धनुर्विद्यामध्ये जिवक खंडारे, तलवारबाजीमध्ये
क्षीतीज राऊत, रुषभ ढवळे, सत्यम शेळके, ध्रुव आळणे, दिव्या खडसे, प्राची शिवपुरे, निशा शिवनकर व प्रल्हाद आळणे, रायफल शूटींगमध्ये जानवी चौधरी, मोहीनी घाटे व रोहीत चव्हाण आणि हॅण्डबॉलमध्ये प्रसाद मांडवगडे यांनी सहभागी होऊन पदक प्राप्त केल्याबद्दल यांचे सत्कार करण्यात आले.
राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत सॉफ्ट टेनिसमध्ये प्रतिक इंगळे, आदिती मोरे व वैष्णवी खानझोडे धनुर्विद्यामध्ये मोहक सावले, कुणाल चौधरी व धनश्री पावडे, आट्यापाट्यामध्ये राधा जाधव, भूमिका सावद, लक्ष्मी राठोड, पूजा चव्हाण, सुचिता चव्हाण, मिलन पवार, रोशनी पवार व अर्णव वाघ, सिकई मार्शलआर्टमध्ये यश सोनवणे, प्रेम मोरे आणि दुर्गेश धाडवे आदी खेळाडुंचा सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.
निवृत्त क्रीडा शिक्षक निवृत्ती भजणे एन. बी. शेळके, विद्या कुंभी, संजय वाघ यांचेही यावेळी सत्कार करण्यात आला. छत्रपती पुरस्कारार्थी अजित बुरे, महेश ठाकरे व ५ टक्के खेळाडू आरक्षणाअंतर्गत नियुक्त खेळाडू यांची पोलीस उपनिरिक्षक पदी निवड झाल्याबद्दल अजिंक्य महाले, महेश बोथीकर आणि पोलीस विभागामध्ये नियुक्त जिल्हा प्रशिक्षण केद्रांचे खेळाडू भागवत बोरकर व रमेश शिंदे यांचा यावेळी सत्कार करण्यातआला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील संतोष फुफाटे, प्रकाश मोरे, विकास तिडके, शुभम कंकाळ, भारत वैद्य, कलीम बेग मिर्झा, भागवत मापारी, वृक्षा तोडसे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन शाम वानखेडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार राज्य क्रीडा मार्गदर्शक अक्षय टेंभुर्णीकर यांनी मानले.