देवरी,दि.०७-एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत शासकीय आणि अनुदानित आश्रमशालेतील विद्यार्थ्यांसाठी प्रकल्पस्तरीय क्रीडास्पर्धांना आज (दि.०७) पासून बोरगावच्या एकलव्य मॉडेल रेसिडेंसियल पब्लिक स्कूलच्या क्रीडांगणावर मोठ्या थाटात सुरवात करण्यात आली.
या तीन दिवसीय क्रीडा स्पर्धेच्या अध्यक्षस्थानीदेवरीचे प्रकल्प अधिकारी उमेद काशिद हे होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोरगावच्या सरपंच कल्पना देशमुख, उपसरपंच काशिताई कुंजाम, माजी फौजदाप उमाशंकर शर्मा, सलामे गुरूजी, सहायक प्रकल्प अधिकारी सायली चिखलीकर आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली.
आदिवासी विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना वाव मिळावा, यासाठी दरवर्षी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या तीन दिवसीय क्रीडा स्पर्धेमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजित केले जाते. यात गोंदिया जिल्ह्यातील 11 शासकीय आश्रम शाळा आणि 23 अनुदानित आश्रम शाळा येथील नवशेच्यावर विद्यार्थी या उपक्रमांमध्ये सहभागी झाले होतो. या क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून आदिवासी विभागातील विद्यार्थ्यामधील कलागुणांचा विकास साधला जातो. या आय़ोजनातून आदिवासी विभागात राहणारे विद्यार्थी सुद्धा उच्च प्रतिमेचे धनी असल्याचे वारंवार समोर आले आहे. या क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून अनेक होतकरू विद्यार्थ्याच्या आयुष्याची जडणघडण होण्यास मदत झाली आहे. यामध्ये विशेषतः गोंदिया जिल्ह्याने आपला दबदबा कायम ठेवला आहे.
संचालन श्री देवगडे सर यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रदर्शन एस टी भुसारी, क्रीडा समाज अधिकारी यांनी मानले.