अर्जुनी मोरगाव केंद्रस्तरीय क्रीडा व साँस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन

0
46

अर्जुनी मोरगाव,दि.१०ः अटल जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव केंद्र स्तरीय केंद्र अर्जूनी मोरगावचे उदघाटन जिल्हा परिषद सदस्य व सभागृहाचे गटनेते लायकराम भेंडारकर यांच्या हस्ते जिल्हा परिषद सदस्य कविता कापगते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.यावेळी पंचायत समिती सभापती सविताताई कोडापे,उपसभापती होमराज पुस्तोडे,पंचायत समिती सदस्य संदिप कापगते,शालीनी डोंगरवार,महालगाव सरपंच मिनाताई शहारे,दाभना सरपंच लिनाताई प्रधान, गटशिक्षणाधिकारी अनिल चव्हाण,शहारे,प्रा.बन्सोड, प्रफुल्ल जोशी केंद्र प्रमुख, एन.एस.लंजे व मान्यवर उपस्थित होते. यावेळी केंद्रातील अकरा शाळेतील मुख्याध्यापक, सहाय्यक शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी विद्यार्थिनी पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात लेझीम पथक व्दारे पाहुण्यांचे आगमन, मानवंदना, ध्वजारोहण, दिपप्रज्वलन पुजन, प्रास्ताविक, मान्यवर मंडळी मनोगत, लेझीम नृत्य, माध्यमिक विभाग कब्बडी उदघाटनीय सामना संपन्न झाला.