अर्जुनी/मोरगाव पोलीसांची स्पेशल ड्राईव्ह मोहीम

0
51

अर्जुनी/मोरगाव – काही दिवसांपुर्वी डुग्गीपार पोलीस स्टेशन च्या हद्दीत कोहमारा-गोंदिया मार्गावरील खजरी गावाजवळ झालेल्या शिवशाही बस अपघाताच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन अर्जुनी/मोरगाव यांच्या हद्दीत शुद्धा अपघाताचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने दि.07 डिसेंबर 2024 रोजी स्पेशल ड्राईव्ह मोहीम राबविण्यात आले.त्यामध्ये पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पायी-पायी पेट्रोलिंग करत अर्जुनी/मोरगाव शहरातील महत्त्वाच्या तसेच चौकाच्या ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली आणि स्पेशल ड्राईव्ह दरम्यान मोटार वाहन कायद्या अंतर्गत विना हेल्मेट, drunk and drive, ट्रिपल शीट, रॅश ड्राईव्ह कलम 285 भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये कारवाई करण्यात आली.सदर स्पेशल ड्राईव्ह अर्जुनी/मोरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आली.