विभागीय पोलिस क्रीडा स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याचे वर्चस्व

0
12

चंद्रपूर संघाने केली ६३ पदकांची कमाई

गोंदिया : नागपूर परिक्षेत्रीय पोलिस क्रीडा स्पर्धा-२०२४ चे आयोजन गोंदिया येथे करण्यात आले होते. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या क्रीडा स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर विजेत्या खेळाडूंना पुरस्कार वितरीत करून स्पर्धेचा समारोप करण्यात आला. या स्पर्धेत चंद्रपूर जिल्हा पोलिस संघाने चौफेर उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत तब्बल ६३ पदकांची कमाई केली. या  विभागीय पोलिस क्रीडा स्पर्धेवर चंद्रपूर जिल्हा पोलिस संघाचे वर्चस्व राहिले. विशेष म्हणजे, चंद्रपूर संघाने १७ सुवर्ण तर गडचिरोली संघाने १९ व नागपूर संघाने २१ सुवर्ण पदक प्राप्त केले आहे.