परभणी, दि.12 : जिल्हास्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतीक स्पर्धेचे आज शुक्रवार (दि. 10) रोजी श्री शिवाजी महाविद्यालय, परभणी येथे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांचे हस्ते उद्घाटन झाले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. बाळासाहेब जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणविरकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) संगीता चव्हाण, श्रीमती देवकुळे, उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे, जीवराज डापकर, शैलेश लाहोटी, संगीता सानप, जिल्हा क्रिडा अधिकारी कविता नावंदे यांची उपस्थिती होती.
सर्व तहसिलदार, नायब तहसीलदार, संघटनाचे पदाधिकारी, मंडळ अधिकारी, सहायक महसूल अधिकारी, महसूल सहायक, ग्राम महसुल अधिकारी, शिपाई, महसुल सेवक यांचा विविध खेळामध्ये सहभाग आहे.


