गोंदिया,दि.२०-गोंदिया जिल्हा परिषदेच्या अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात प्राथमिक विभागात खो खो मध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बिरसोला यांनी जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावले.याबद्दल जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहागंडाले,उपाध्यक्ष व शिक्षण सभापती इंजी.यशवंत गणवीर,मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगांनाथम एम यांच्या हस्ते पुरस्कार वितरीत करण्यात आले. जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत दर वर्षी क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते सदर प्रसंगी बिरसोला शाळेने केंद्रातून खो खो मध्ये प्राथमिक व उच्च प्राथमिक गटातील केंद्रातून मुले व मुली विजेता झाले. त्या नंतर जिल्हात प्राथमिक मुली खो खो व उच्च प्राथमिक मुली खो जिल्हात गोरेगाव येथे जिल्हा स्तरीय कार्यक्रमात मध्ये प्राथमिक गटातील मुली नी जिल्हात द्वितीय क्रमांक प्राप्त केले.
याचे श्रेय सर्व पालक तसेच शाळेचे मुख्यध्यापक सेवकराम बिसेन,चंदू दुर्गे, विजय वैद्य,कैलास दंदरे,संगीता गजबे, ईश्वारी परिहार, चैताली होटे,कीर्ती सेवईवार, पाचे मॅडम तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष केशोराव नागफासे, राजेश दंदरे, व सदस्य तसेच गावातील सर्व पालकांनी याच्या कार्याची स्तुती केली.
अटल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत बिरसोला शाळा खो.खो मध्ये प्रथम
शिक्षण व हरित क्रांतीचे जनक स्व. मनोहरभाई पटेल यांना अभिवादन