अमरावती : जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी जिल्हास्तरीय क्रिडा व सांस्कृतिक महोत्सवात धारणी पंचायत समितीने चॅम्पियन चषक प्राप्त करून मैदान गाजविले. सांस्कृतिक कार्यक्रमातही धारणीने आपले वर्चस्व सिद्ध केले. चार दिवसीय क्रीडा महोत्सवात उपस्थितांना हार-जीत सोबतच आनंदोत्सवचा अनुभव आला. जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी विभागीय क्रिडा व सांस्कृतिक महोत्सवाचा पारितोषिक वितरण सोहळा रविवारला (ता.२) संपन्न झाला. जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांचे हस्ते बक्षीस वितरण सोहळा घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रीती देशमुख ह्या होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा क्रीडा महोत्सवाचे सचिव बालासाहेब बायस, उपमुख्यकार्यकारी अधिकारी संजय खारकर, विलास मरसाळे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेश गायकवाड, कृषिविकास अधिकारी मलप्पा तोडकर यांच्यासह सर्व तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी व विस्तार अधिकारी व क्रीडा संयजोक डॉ. नितीन उंडे, उपसंयोजक पंकज गुल्हाने मंचावर उपस्थित होते.
जिल्हा स्तरीय क्रिकेटमध्ये पुरुष विभागात नांदगाव खंडेश्वर विजयी तर तिवसा पंचायत समितीचा संघ उपविजयी ठरला. क्रिकेट मध्ये महिला विभागात चांदूर बाजार विजयी व धामंगावचा संघ उपविजयी झाला. खो खो पुरुष विभागात धारणी विजयी व चिखलदरा उपविजयी झाला. खो खो महिला विभागात दर्यापूर विजयी व नांदगाव उपविजयी झाले. कबड्डी मध्ये पुरुष विभागात धारणी विजयी व चिखलदराचा संघ उपविजयी झाला. कबड्डी महिला विभागात अमरावती विजयी तर चिखलदरा उपविजयी झाला आहे. व्हॉलीबॉल पासिंग पुरुषमध्ये चांदूर बाजार तर महिला मध्ये नांदगाव खंडेश्वरने बाजी मारली. व्हॉलीबॉल स्ट्रोक दर्यापूर ने बाजी मारली. फुटबॉल मध्ये अमरावती येथील मुख्यालयाने बाजी मारली असून धामणगाव पंचायत समितीचा संघ उपविजयी ठरला आहे.
बॅडमिंटन एकेरीमध्ये पुरुष विभागात भातकुली येथील स्वप्नील उपासे विजयी झाले.तर चिखलदरा येथील जीवन गवई उपविजयी झाले.महिला विभागात चांदूर रेल्वे येथील शीतल देशमुख विजयी तर अमरावती येथील विनिता बोरोडे उपविजयी ठरल्या. बॅडमिंटन दुहेरीमध्ये पुरुष विभागात भातकुली येथील सतिश वानखडे, स्वप्नील उपासे विजयी व धारणी येथील डी.तिडके, गोवर्धन बारगजे, उपविजयी झाले. महिला विभागात चांदुर रेल्वे येथील शीतल देशमुख, स्नेहल देशमुख विजयी झाल्या व वनिता बोराडे, उज्वल राऊत उपविजयी झाले. बॅडमिंटन एकेरी ४५ वर्षावरील पुरुष विभागात तिवसा येथील गजानन जाधव विजयी व चिखलदरा येथील जीवन गवई उपविजयी झाले. महिला विभागात चांदुर रेल्वे येथील शीतल देशमुख विजयी व अमरावती येथील उज्वल राऊत उपविजयी झाले.
टेनिक्वॉईट एकेरीमध्ये पुरुष विभागात चांदूर बाजार येथील शहजाद अहमद विजयी व दर्यापूर येथील विनोद जामनिक उपविजयी झाले.महिला विभागात चांदूर बाजार येथील उज्ज्वला वानखडे विजयी व धारणीयेथील वैशाली गरकल,रेखा वडतकर उपविजयी झाल्या.टेनिक्वॉईट दुहेरीमध्ये चांदूर बाजार येथील शहजाद अहमद,मोहम्मद अजीम विजयी व अमरावती येथील डि.मोहोड,राज कुंजेकार उपविजयी झाले.महिला विभागात धारणी येथील शीतल धुर्वे,रेखा वडतकर विजयी व अमरावती येथील सरोज घुटे,विजया सोळंके झाल्या.कॅरम एकेरीमध्ये पुरुष विभागात दर्यापूर येथील डी.श्रीनाथ विजयी व धारणी येथील मोहम्मद शफी उपविजयी झाले.महिला विभागात चिखलदरा येथील सरिता काठोळे विजयी व नांदगाव येथील जया गवई उपविजयी झाले.”
२०० मीटर धावणे मध्ये पुरूष विभागात नांदगाव येथील राजू कांबळे विजयी व वरूड येथील रवी इंगळे उपविजयी झाले. महिला विभागात धारणी येथील दिपाली भिलावेकर विजयी व अमरावती येथील मीनल करस्कर उपविजयी झाल्या.४०० मीटर धावणे मध्ये पुरुष विभागात धारणी येथील किशोर झाडे विजयी व नांदगाव येथील सीताराम जाधव उपविजयी झाले. महिला विभागात अमरावती येथील मीनल करस्कर विजयी व नांदगाव येथील अर्चना कवाने उपविजयी झाल्या.१५०० मीटर धावणे मध्ये पुरुष विभागात भातकुली येथील गजानन भातकुलकर विजयी व नांदगाव येथील सीताराम जाधव उपविजयी झाले.महिला विभागात चांदूर रेल्वे येथील ब्रुकशिल्प वलके विजयी व धारणी येथील अनिता भिलावेकर उपविजयी झाल्या.४५ वर्षांवरील १०० मीटर धावणे मध्ये पुरुष विभागात धारणी येथील पांडुरंग ढाकणे विजयी तर धामणगाव येथील अजय बावणे उपविजयी झाले.महिला विभागात चांदूर बाजार येथील स्मिता देशमुख विजयी व धामणगाव येथील रंजना मेंढे उपविजयी झाल्या.
तसेच स्विमिंग ५० मीटर मध्ये तिवसा येथील दिनेश नगरकर विजयी व मोर्शी येथील रोशन पांडे उपविजयी ठरले.स्विमिंग १०० मीटर मध्ये मोर्शी येथील मोहम्मद कलीम विजयी व धारणी येथील बूनेश धूरवे उपविजयी झाले.स्विमिंग ५० मी (४५ वर्षावरील) मध्ये अमरावती येथील नितीन नवाथे विजयी व नांदगाव येथील राजाभाऊ राजनकर उपविजयी झाले.
स्विमिंग १०० मी (४५ वर्षावरील) मध्ये अमरावती येथील नितीन नवाथे विजयी व नांदगाव येथील राजाभाऊ राजनकर उपविजयी झाले. बुद्धिबळ मध्ये पुरुष विभागात धारणी येथील हिरालाल रावत विजयी व मोर्शी येथील वसंत आकोलकर उपविजयी झाले.महिला विभागात अंजनगाव सूर्जी येथील रेखा खूपसे विजयी व धामणगाव येथील किशोरी पारेकर उपविजयी झाल्या.
सांस्कृतिकमध्ये धारणी विजयी तर अमरावती उपविजयी
सांस्कृतिक कार्यक्रमातही धारणी पंचायत समितीने बाजी मारली असून कराओके गायन प्रकारात अचलपूर प्रथम तर चांदूर बाजार पंचायत समितीने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. हास्यजत्रा या प्रकारात धारणी प्रथम व धामणगाव पंचायत समिती द्वितीय ठरली आहे.एकल नृत्यात मुख्यालय अमरावती प्रथम व तिवसा,अंजनगाव सुर्जीने द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.समूह नृत्यात वरूड प्रथम व तिवसा द्वितीय ठरले आहे.भावगीत,भक्तीगीत,लोकगीतमध्ये चांदुर बाजार प्रथम व तिवसा द्वितीय ठरले आहे.सिने गीत/युगल गीत मध्ये अमरावती पंचायत समितीने प्रथम क्रमांक प्राप्त केला असून चांदुर बाजार पंचायत समिती द्वितीय क्रमांकाच्या बक्षिसाची मानकरी ठरली आहे. सांस्कृतिक कार्यक्रम एकत्रित मध्ये धारणी विजयी तर अमरावती उपविजयी ठरली आहे. समारोपीय कार्यक्रमाचे संचालन सुनिता लहाने व शैलेश दहातोंडे यांनी केले.
सांघिक व वैयक्तीक स्पर्धा मध्ये क्रिकेट, फुटबाॅल, व्हाॅलीबाॅल, कबड्डी,खो खो, टेनिक्वाईट, बॅडमिटन, टेबलटेनिस, कॅरम, बुध्दीबळ, जलतरण, धावणे,भालाफेक, गोळाफेक,थाळीफेक,लांब उडी,उंच उडी या खेळ प्रकारातील सर्व यशवंत महीला व पुरूष खेळाडूंना बक्षीस वितरित करण्यात अशी माहिती क्रिडा संयोजक डाॅ.नितिन उंडे,सहसंयोजक पंकज गुल्हाने यांनी दिली. आले. असे प्रसिध्दी समितीचे विनायक लकडे,शकील अहमद, राजेश सावरकर, श्रीनाथ वानखडे यांनी कळविले आहे.