Home विदर्भ मृतकांचे कुटुंबियांचे आमदार बडोले,जि.प.अध्यक्ष भेंडारकर यांनी केले सांत्वन

- अर्जुनी-मोर. –तालुक्यातील अरततोंडी/ दाभना येथे 13 वर्षीय दोन चुलत भावांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने आज तारीख 2 फेब्रुवारी रोजी या विभागाचे आमदार राजकुमार बडोले तातडीने मृतकाच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी लगेच पोहोचले. सर्वप्रथम त्यांनी ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोर येथे शवविच्छेदनगृहाला भेट देऊन घटनेची ईतवृत्त माहिती घेतली. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून पातोडे कुटुंबाच्या दुःखात आपण सहभागी आहोत.असी भावना व्यक्त केली. मृतकाच्या कुटुंबीयांना कशा पद्धतीने मदत करता येईल यासाठी आपण प्रयत्नशील राहू असेही आमदार राजकुमार बडोले यांनी सांगितले.
तालुक्यातील अरततोंडी/ दाभना येथील रितिक रुपराम पातोळे वय तेरा वर्ष व दुर्गेश धनंजय पातोडे वय तेरा वर्ष या दोघांचाही 2 फेब्रुवारी रोजी गावाजवळील तलावात बुडून मृत्यू झाला.त्यामुळे संपुर्ण गावात शोकाकुल वातावरण आहे.
*जि.प.अध्यक्ष भेंडारकर यांनीही केले सांत्वन*
गोंदिया जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या बोंडगाव देवी जिल्हा परिषद क्षेत्रात अरततोंडी हे गाव येत असल्याने त्यांनी तातडीने आमदार राजकुमार बडोले सह या गावाला भेट देत मृतकांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी दोन्ही नेत्यांनी ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगावला भेट देत तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना तातडीने शवविच्छेदन करण्याच्या सूचना दिल्या यावेळख आमदार राजकुमार बडोले, जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर ,भाजपा तालुका अध्यक्ष विजय कापगते, पंचायत समिती उपसभापती संदीप कापगते, अरततोंडीचे सरपंच प्रदीप कांबळे, दीपंकर उके, मोरेस्वर रहले, चिंतेश्वर लंजे व शेकडो नागरिक उपस्थित होते.