@ मो. आंजी जिल्हा वर्धा येथे सहभागी होणार
अर्जुनी-मोर.-तालुक्यातील नवेगावबांध येथील स्व.मुजफर पठान मित्र मंडळ ची खेडाळू कशिश राजू जांभूळकर हीचा 16 वर्षीय सब जुनियर राज्यस्तरीय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेच्या निवड चाचणी मधे राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड करण्यात आली असून वर्धा जिल्ह्यातील मोठी आँजी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत नागपूर विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे . स्थानिक जि.प.कनिष्ठ महाविद्यालय नवेगाव बांध येथे वर्ग 9 वी मध्ये शिक्षण घेत असून गोंदिया जिल्ह्यातून एकमेव मुलीमधून निवड झाल्याने शाळेसाठी एक गौरवाची बाब ठरली आहे. या आधीही नुकतेच झालेल्या कोल्हापूर येथे 14 वर्षीय राज्यस्तरीय सब ज्युनियर व्हॉलीबॉल स्पर्धेत दोन विद्यार्थ्यांची निवड होवून स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावून नवेगाव बांध गावाचे नावलोकिक केला आहे. स्थानिक स्व. मुजफर मित्र मंडळाच्या घेत असलेले परिश्रमाचे मोठे यश पहायला मिळत आहे.
महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोशियशन च्या वतीने आयोजित स्पर्धा दिनाक 7 ते 9 फरवरी 2025 होणाऱ्या मोठी आंजी जिल्हा वर्धा येथे आयोजित केली आहे. राज्यस्तरीय सब जूनियर व्हॉलीबॉल स्पर्धे मध्ये निवड झाल्याबद्दल तिचे जि. प. कनिष्ठ महाविद्यालयाच्या शाळा समिती अध्यक्ष सौ.रचनाताई गहाने , प्राचार्य जाधव सर , सामाजिक कार्यकर्ते अमृतलाल टांक, उद्योगपती नितीन पुगलिया, शैलेश जायसवाल, सूनिलभाऊ तरोणे, प्रभाकर पुस्तोडे ,नीलमचंद पंधरे, रामदास बोरकर, संजीव बडोले, स्व.मुजफर पठान मित्र मंडळाचे अध्यक्ष विजय डोये, जगदीश मेश्राम,मुबारक आली, अमित शहरे , संजय मेश्राम, सचिन ठाकरे , दीपक शिरसागर, नदीम शेख ,विनय चांडक, राकेश बर्वे, जेकी पटेल, भावेश टांक, राहुल नरुले, अजय बडोले, सागर राऊत, जय गाढवे, सुवानंद सोंनटक्के, महेश भुमके, वीरेंद्र येरने , धीरज नेवारे, मयूर पशीने, यांनी अभिंनंदन केले .