गोंदिया,दि.०७ः गोंदिया भंडारा जिल्ह्याचे स्वनामधन्य नेते शिक्षण महर्षी स्व.मनोहरभाई पटेल यांच्या ११९ व्या जयंती समारोहाचे आयोजन ९ फेब्रुवारी रविवारला दुपारी १.०० वाजता डी.बी. सायन्स महाविद्यालयाच्या भव्य पटांगणात आयोजित करण्यात आले आहे.या समारोहाच्या आयोजनाची जोरदार तय्यारी सुरु करण्यात आली असून गोंदिया शिक्षण संस्थेचे सचिव व माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे. समारोहात गोंदिया भंडारा जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल,खासदार प्रफुल पटेल, तर प्रमुख अतिथी म्हणून जुबिलेंट लाइफसायंसेज चे प्रबंध निदेशक हरी भरतीया, माजी खासदार नरेश गुजराल, उद्योजक मोहित गुजराल व मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाचे नियोजन व जय्यत तयारीची पूर्व तयारी म्हणून कार्यक्रम स्थळाची पाहणी माजी आमदार राजेंद्र जैन यांनी आज केली.तसेच समारोहाला भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील नागरिक विद्यार्थी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले.