43.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home क्रीडा सायकलिंग संडे ग्रुप चे 2 सदस्य करणारा गोंदिया ते पंढरपूर सायकलवारी

सायकलिंग संडे ग्रुप चे 2 सदस्य करणारा गोंदिया ते पंढरपूर सायकलवारी

0
72

blank

१३ तारखेला गोंदिया येथून सुरू करणार पंढरपूर सायकलवारी
गोंदिया :- पर्यावरण संरक्षण, आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आणि पेट्रोल बचत याबद्दल जन जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने, टायगर ग्रुप ऑफ अ‍ॅडव्हेंचर आणि नागपूरच्या क्रीडा भारती यांनी संयुक्तपणे आषाढी एकादशीनिमित्त १५ ते २२ जून दरम्यान नागपूर ते पंढरपूर सायकलवारीचे आयोजित केले आहे. या सायकलवारी मध्ये १३ ते ८५ वयोगटातील लोकांनी सहभाग घेतला असून  विदर्भातील ८५ सायकलस्वार सहभागी होणार आहेत. यामध्ये गोंदिया शहरातील सायकलिंग संडे ग्रुपचे दोन सदस्य अशोक मेश्राम व माजी सैनिक उदयभान निर्वाण हे या पंढरपूर सायकलवारी मध्ये सहभागी होणार आहेत. ही सायकल वारी 13 जूनला सकाळी 6 वाजे जयस्तंभ चौक येथून सुरू होणार आहे. तर नागपूर येथून संपूर्ण विदर्भातील सायकलिस्ट 15 जूनला नागपूर येथील गुरुदेव नगर मंदिरापासून सुरू होणाऱ्या या सायकलवारीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हिरवा झेंडा दाखवतील.

साडेतीन हजार सायकलस्वार सहभागी
२२ तारखेला पंढरपूरमध्ये बैठक आणि रिंगण समारंभ संपूर्ण महाराष्ट्रातून ८२ वेगवेगळ्या क्लबचे सायकलस्वार पंढरपूरमध्ये एकत्र येणार आहेत आणि वारकऱ्यां प्रमाणे २२ जून रोजी ‘रिंगण सोहळा’ हा कार्यक्रम होणार आहे. राज्यभरातून सुमारे साडेतीन हजार सायकलस्वार यात सहभागी होतील

blank