अखिल भारतीय नागरी सेवा क्रीडा व कला स्पर्धांकरीता अर्ज आमंत्रित

0
21

गोंदियादि.20: केंद्रीय सिव्हील सेवा सांस्कृतिक आणि क्रीडा मंडळ, नवी दिल्ली यांच्या वतीने विविध क्रीडा व कला प्रकारातील अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धा दरवर्षी आयोजित केल्या जातात. केंद्रीय क्रीडा नियंत्रण मंडळाच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली या स्पर्धा निरनिराळ्या राज्य शासनाच्या वतीने त्या त्या राज्यामध्ये आयोजित केल्या जातात. या स्पर्धांसाठी विविध क्रीडा व कला प्रकारांतील महाराष्ट्र शासनाचा संघ, निवड चाचणी घेऊन स्पर्धांसाठी पाठविले जातात.

        विविध क्रीडा व सांस्कृतिक प्रकारातील महाराष्ट्र शासनाच्या संघाची निवड करणे व निवड झालेल्या खेळाडूंना सराव / प्रशिक्षण देणे, तसेच राज्यात या स्पर्धांचे आयोजन करणे यासाठी समन्वयक यंत्रणा म्हणून सचिवालय जिमखाना, मुंबई यांची शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या  17 ऑक्टोबर, 2022 चे शासन निर्णय अन्वये नेमणूक करण्यात आली आहे.

       राज्य शासनाकडून सचिवालय जिमखान्यास या स्पर्धासाठी महाराष्ट्र शासनाचा, विविध क्रीडा व कला प्रकारांतील संघ निवडण्याची व त्यांच्या प्रशिक्षण शिबीराची जबाबदारी सोपविली आहे.

       तरी गोंदिया जिल्हयातील विविध कार्यालयात कार्यरत असलेले खेळाडू /नियमित कर्मचारी यांना टेवल टेनिस, बॅडमिंटन, फुटबॉल, हॉकी, क्रिकेट, व्हॉलीबॉल, जलतरण, बास्केटबॉल, कॅरम, बुध्दीबळ, ॲथलेटिक्स, कबड्डी, वेटलिफ्टींग, पॉवरलिफ्टींग, शरिरसौष्ठव, कुस्ती, लॉन टेनिस, खो खो, योगा सत्र, संगीत, नृत्य व लघुनाटय इत्यादी क्रीडा व कला प्रकारांत सन 2025-26 करीता अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धातून ज्या खेळाडू/कर्मचा-यांना भाग घ्यावयाचा असेल त्यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गोंदिया येथे विहित नमुन्यातील आवेदन पत्रासाठी कार्यालयीन वेळेत संपर्क करावा, व आवेदन पत्र परिपुर्ण भरून कार्यालय प्रमुख / विभाग प्रमुख यांच्या मान्यतेने व्यवस्थापक, सचिवालय जिमखाना, मुंबई 400032 यांच्याकडे स्पर्धेपूर्वी टपालाद्वारे / व्यक्तीच्या तसेच ईमेलद्वारे पाठवावित व अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी अनिराम मरसकोले यांनी कळविले आहे.