39.8 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home क्रीडा बुध्दीबळ स्पर्धेत माॅडेल काॅन्व्हेटंचे सुयश

बुध्दीबळ स्पर्धेत माॅडेल काॅन्व्हेटंचे सुयश

0
38

blank

गोरेगाव,दि.११ :मॉडेल कॉन्व्हेन्ट गोरेगांव या शाळेतील विद्यार्थ्यांनी दि. 11.08.2025 ला झालेल्या तालुकास्तरीय स्पर्धेत विजयाची परंपरा निरंतर राखत अंडर 14 मुली या गटात बुद्धिबळ मध्ये निधी भरत तुप्पट प्रथम क्रमांक, जेनी कृष्णकुमार शिंगाडे द्वितीय क्रमांक, अंडर 14 मुले दक्ष प्रशांत बारेवार प्रथम क्रमांक पटकावून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आले.विजयी सर्व विद्यार्थ्यांचे संस्था सचिव आर.डी.कटरे, मुख्याध्यापक सौ.सी.पी.मेश्राम, पर्यवेक्षक आर.बी. कोल्हे, क्रीडा शिक्षक ए. आर.रामटेके यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय क्रीडा शिक्षक ए. आर.रामटेके व सर्व शिक्षकांना दिले.

blank