32.9 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home क्रीडा इंडो नेपाळ स्पोर्ट्स चॅम्पियनशीप मधे मिशन ऑलिम्पिक गेम असोसिएशन कोल्हापूरच्या खेळाडूंचे यश

इंडो नेपाळ स्पोर्ट्स चॅम्पियनशीप मधे मिशन ऑलिम्पिक गेम असोसिएशन कोल्हापूरच्या खेळाडूंचे यश

0
45

कोल्हापूर,दि.01 फेब्रुवारीः मिशन ऑलम्पिक गेम असोसिएशन ऑफ इंडियाच्या मार्फत झालेल्या इंडो-नेपाळ चॅम्पियनशिपमध्ये कोल्हापूरच्या खेळाडूंनी यश मिळविले आहे.यामध्ये महाराष्ट्रातील गोपाळ कृष्ण गोखले कॉलेज, कोल्हापूर व कर्नाटकमधील 56 खेळाडू व 4 प्रशिक्षकांसह भारतीय गेलेल्या चमूने नेपाळ येथील पोखरा येथे आयोजित कबड्डी, खोखो, बॉक्सिंग, अथलेटिक अशा खेळांमध्ये भाग घेतला.यात खेळाडूंनी 30 गोल्ड, 20 सिल्वर व 6 ब्रांझ टोटल 56 मेडल्स मिळवले.प्रशिक्षक म्हणून सय्यद शेख,मुल्ला, प्रा. एन. आर. कांबळे, प्रा. स्मिता गिरी व सौरभ पाटील कबड्डी कोच यांचे मार्गदर्शन लाभले.
शिक्षण प्रसारक मडंळ कोल्हापूरचे सचिव प्रा.जयकुमार देसाई, अध्यक्षा शिवानीताई देसाई, उपाध्यक्ष माजी प्राचार्य शिवाजीराव सावंत, पेट्रन सदस्य युवानेते दौलतराव देसाई, प्रशासनाधिकारी प्रा. डॉ.मंजिरीताई देसाई,प्राचार्य डॉ. पी के पाटील, उपप्राचार्य पिसाळसर यांनी मित्रपरिवार, नातेवाईक यांचेकडून खेळांडूचे अभिनंदन करण्यात येत आहे.