साकोली,दि.13ःमेकॅनिकल इंजिनिअरींग करून नोकरीच्या मागे न धावता वडीलांच्याच गैरेजमधे ट्रैक्टर दुरूस्तीचे जड कामे करून धनश्री ने महिलाही वर्कशॉपच्या अतिशय जडकामात मागे नाहीत हे सिद्ध करून दाखविले आहे. या कामात स्वतःला झोकणारी ही जिल्ह्यातील पहिली महिला आहे. तिच्या या जिद्द व चिकाटीच्या कामाबद्दल बाजार समिती संचालक व नगरसेवक अँड मनिष कापगते यांनी तिचे कौतुक केले आहे.
धनश्री प्रेमलाल हातझाडे वय २२ रा. चांदोरी उसगांव असे या जिद्दी व कष्टाळू मुलीचे नाव असून तीने बीई मैकनिकल इंजिनिअरींग केले. तिच्या वडीलांचे साकोलीत मामा ट्रैक्टर दुरूस्तीचे दूकान आहे. तिने आपल्या वडीलांचा आधार बनन्याचा निर्णय घेतला आणि या दृढ संकल्पना करून पदवी मिळल्यानंतर गेल्या ३ महिन्यापासून दुकानात ट्रॅक्टर दुरुस्तीचे काम सुरू केले. तिच्या वडीलांजवळ सन १९८८ मध्ये याच मैकनिकल अभ्यासक्रमाच्या शुल्कासाठी १४०० रूपये नव्हते. त्यांची ही गरज त्यावेळी स्व. डॉ. कालीदास कापगते पूर्ण केली होती. आज मुलगी सोबत तेच काम करताना पाहून त्या जुन्या दिवसांची आठवण होते, असे प्रेमलाल म्हणतात. आज खर्या अर्थाने परिश्रमाचे चीज झाल्याचे धनश्रीने बोलून दाखविले.